कमी खर्चाचे लागवड तंत्राच्या प्रमुख बाबी• रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकांची कापणी काढणी होताच शेताची मशागत ( नागरटी / कुळवणी ) सुरू करा . . • उन्हाळ्यामध्ये क्खर पाळ्या देऊन जमीन चांगली तापू द्या . • पेरणीपूर्वी बियाण्यास बीज प्रक्रिया ( बुरशनाशक / जीवाणू संवर्धन ) अवश्य करा. • पिकाची पेरणी पुरेसा पाऊस होताच शिफारशीत वेळी करा. • पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणशक्ती ( घरच्या घरीच ) तपासून त्यात बुरशीनाशकाची जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया अवश्य करा . • पिकाची पेरणी समतल ( कंटूर ) रेषेला समांतर किंवा उताराला आडवी करा . • हेक्टरी ताटांची ( झाडांची ) योग्य संख्या राखण्याकरिता बियाणे शिफारस केलेल्या प्रमाणातच वापरा. • शिफारशीत आंतरपीक पद्धतींचा / दुबार पीक पद्धतीचा अवलंब करा. • पेरणीसाठी अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची निवड करा . • वेळोवेळी आंतरमशागत करून शेत तणविरहीत ठेवा . • शेवटच्या कोळपणीचे वेळी जानकुळास दोरी बांधून पिकाला मातीची भर द्या . • मित्र किटकांचे संवर्धन संगोपन करा. • अति आवश्यक असेल तेव्हाच रासायनिक किटकनाशकाचा ( शिफारशीत प्रमाणातच ) वापर करा . • पिकाची काढणी कापणी योग्य वेळी करा. • धान्य साठवण्यापूर्वी कडक उन्हात वाळवा . |
---|
शुद्ध बीजापोटी …. फळे रसाळ गोमटी …. |
---|