करडी ( करडई ) पीक ( Kardai in English )

करडी ( करडई ) पीक ( Kardai in English )
करडी ( करडई ) पीक

करडी ( करडई )

( Kardai in English )

करडी हे रबी हंगामातील तेलबियाचे महत्वाचे आणि अल्पखर्चिक पीक आहे . महाराष्ट्रात या पिकाखाली २.८७ लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून १.३ ९ लाख मे . टन उत्पादन मिळते . विदर्भात ०.१५ लाख हेक्टर क्षेत्रावर Kardai in English या पिकाची लागवड होत असून त्यापासून ०.०८ लाख टन उत्पादन मिळते ( २००१-०२ ) . 

आपल्या राज्यात प्रामुख्याने परभणी , अहमदनगर , उस्मानाबाद , बुलडाणा , अकोला , जालना , औरंगाबाद , सोलापूर , बीड आणि अमरावती जिल्ह्यात हे पीक घेतले जाते . अवर्षणावर मात करण्याची क्षमता या पिकात आधिक्याने असल्यामुळे इतर रबी पिकांपेक्षा कोरडवाहू क्षेत्राकरिता हे पीक एक वरदान आहे . 

हवामान : ( Kardai in English )

या पिकाला थंड हवामान मानवते . पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत जास्त पाऊस आणि पाणी साचून राहणे या पिकास मानवत नाही . त्याचप्रमाणे अति उष्णतामानाचा आणि अति थंडीचा या पिकावर विपरित परिणाम होतो .

 जमीन : 

या पिकास मध्यम ते खोल , ओल टिकवून ठेवणारी परंतु चांगला निचरा असणारी जमीन असावी . क्षारयुक्त जमिनीत सुद्धा हे पीक घेता येते . 

पूर्वमशागत : ( Kardai in English )

करडीचे एकच पीक घ्यावयाचे ठरविल्यास उन्हाळ्यात एक वेळ नांगरणी , वखराच्या २-३ पाळ्या देऊन , काडीकचरा वेचून जमीन चांगली भुसभुसीत करावी . पावसाळ्यात प्रत्येक नक्षत्रात वखरणी करून पाणी जिरवून तण नियंत्रण करावे . दूबार पीक घ्यावयाचे असल्यास खरीप पिकाचे काढणीनंतर कमीतकमी मशागतीने जमीन पेरणीस तयार करावी , जेणेकरून जमिनीत ओलावा टिकून राहील , म्हणजे उगवण चांगली होऊन रोपसंख्या पुरेशी मिळेल . 

भरखते : 

करडी पीक खतास उत्तम प्रतिसाद देते . पूर्वमशागत करतांना शेणखत / कंपोस्ट खत हेक्टरी ५ टन शेवटचे वखरणी अगोदर जमिनीत मिसळावे . 

बियाणे : 

भारी जमिनीसाठी हेक्टरी १० किलो , तर मध्यम जमिनीसाठी हेक्टरी १२ किलो आणि दुबार पिकासाठी हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे वापरावे . संकरवाणाचे ७.५ किलो बियाणे वापरावे . 

बीज प्रक्रिया : ( Kardai in English )

पेरणीपूर्वी बियाण्यास बीज प्रक्रिया करावी . त्याकरिता थायरम , कॅप्टन किंवा ब्रासीकॉल पैकी कोणतेही एक बुरशीनाशक ३ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे . गुळगुळीत पृष्ठभागावर बुरशीनाशक चिकटून राहण्यासाठी बियाण्यावर प्रक्रियेपूर्वी प्रथम गुळाचे द्रावण शिंपडावे . तसेच पेरणीपूर्वी बियाण्यास ॲझोटोबॅक्टर जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया ( २५० ग्रॅम प्रती १० किलो बियाण्यास ) करावी .

 मर प्रवण भागात मर रोगाच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशकाची ४  ग्रॅम  प्रति किलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी .

पेरणीची वेळ : 

करडईची पेरणी सप्टेंबरचा तिसरा ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात केल्या अधिक उत्पन्न मिळून मावा किडीचा प्रादुर्भाव कमी राहतो . ओलिताखालील करडईची पेर ऑक्टोबर शेवटपर्यंत करण्यास हरकत नाही . बियाणे रात्रभर पाण्यात भिजवून पेरण केल्यास उगवण लवकर व चांगली होते . 

पेरणीची पद्धत : ( Kardai in English )

पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी म्हणजे बियाणे व खते एकाचवेळी देता येतील पेरणी करतांना दोन ओळीत ४५ सें.मी. अंतर ठेवावे . 

आंतरपिके : 

करडी पीक सलग न घेता हरभरा , जवस आंतरपीक पद्धतीमध्ये करडी + हरभरा किंवा करडी + जवस ६ : ३ / ३ : ३ ओळी या प्रमाणात घ्यावे .  

रासायनिक खत मात्रा , वेळ : 

हे पीक रासायनिक खतास उत्तम प्रतिसाद देते . कोरडवाहू करडी पिकास पेरणीसोबत २५ किलो नत्र व २५ किलो स्फुरद ( १२५ किलो अमोनियम सल्फेट + १५० किलो सिंगल सुपरफॉस्फेट ) प्रति हेक्टर द्यावे . ओलिताखालील पिकास हेक्टरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद पेरणीचे वेळी देऊन उरलेला नत्राचा दुसरा हप्ता २० किलो प्रति हेक्टर पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावा . 

विरळणी / नांगे भरणे : 

या पिकाची विरळणी , उगवणीनंतर १०-१२ दिवसांनी करून दोन रोपात २० ते ३० सें.मी. अंतर राखावे . हेक्टरी झाडांची संख्या ७५,००० ते १ लाख पर्यंत ठेवावी . 

आंतरमशागत : ( Kardai in English )

आवश्यकतेनुसार १-२ वेळा निंदणी व डवरणी करून जमीन तणविरहीत व भुसभुसीत केल्याने ओलावा टिकून राहण्यास मदत होते . 

तण व्यवस्थापन : 

जेथे मजुरांची चणचण आहे , तेथे कोरडवाहू करडीमध्ये तणनाशकाचा जरुर भासल्यास वापर करावा . त्यासाठी पेरणीपूर्वी फ्ल्युक्लोरॅलीन १ किलो क्रियाशिल घटक ( २ लिटर बासालीन ) प्रति हेक्टरी ६०० ते ७०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे . 

ओलीत व्यवस्थापन :

जेथे ओलिताची सोय आहे तेथे या पिकास पेरणीनंतर ३० , ५० आणि ६५ दिवसांनी ओलिताच्या तीन पाळ्या दिल्यास अधिक उत्पन्न मिळते . जेथे एकाच ओलिताची सोय आहे . तेथे ५० दिवसांनी , दोन ओलिताची सोय असल्यास ३० व ५० दिवसांनी ओलीत गायें पीक हलक्या जमिनीत घेतल्यास ओलिताच्या ३ ते ५ पाळ्या द्याव्यात . ओलीत करताना पिकात जास्त वेळ पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी . 

कापणी व मळणी : 

पिकाची पाने आणि बोंड्या पिवळ्या पडल्यानंतर पिकाची कापणी करावी . त्यानंतर झाडांचे लहान लहान कडपे गढ़े बांधून शेतातच वाळणीसाठी ठेवावे . गढे चांगले वाळल्यानंतर काठीने बडवून किंवा प्रेशरचे सहाय्याने मळागी करून बी अलग करावे . अलीकडे कंबाईन हारवेस्टरमुळे काढणी सुकर झाली आहे , त्याचा उपयोग करावा नंतर बी स्वच्छ करून , वाळवून साठवावे . 

उत्पादन : 

मध्यम जमिनीत  Kardai in English चे हेक्टरी १० ते १२ क्विंटल आणि भारी जमिनीत १४ ते १६ क्विंटल Kardai in English चे उत्पादन मिळते . ओलित केल्यास २० ते २५ क्विंटल एवढे उत्पादन मिळू शकते . 

Leave a Comment