कागदी लिंबू व लेमन फळझाडांची लागवड
![]() |
कागदी लिंबू व लेमन फळझाडांची लागवड |
जमीन :
संत्रा पिकाप्रमाणेच जमिनीची निवड करावी ,
लागवडीचा हंगाम :
मुख्यत्वे करून पावसाळ्यात लागवड करावी ,
अंतर : लिंबू ६*६ मीटर ( २७७ झाडे प्रती हेक्टर ) . लेमन ५*५ मीटर ( ४०० झाडे प्रती हेक्टर )
जाती : कागदी लिंबू : प्रमालिनी , विक्रम , साई सरबती , स्थानिक , लेमन सीडलेस लेमन .
खूट : लेमनची कलमे जंबेरी वरील असावीत . कागदी लिंबूचे रोपच लावावे .
पाणी पुरवठा : वर्षातून सुमारे २५ ते २८ पाण्याच्या पाळ्या लागतात .
वळण व छाटणी : संत्रा पिकाप्रमाणेच करावी .
आंतरपिके व बहार धरणे :
कागदी लिंबाला वर्षभर फळे येतात . ती मुख आंबिया , मृग व हस्त बहाराची असतात . झाडे लहान असताना व मोठी झाल्यावर संत्र्याप्रमाणेच आंतरपिके घ्यावीत . हस्त बहाराची फळे मिळण्यासाठी विशेष उपाय योजना करावी .
खोडाला मलम लावणे :
एक मीटर उंचीपर्यंत खोडाला १ : १ : १० याप्रमाणात बोडा मलम लावावा .
फळे तोडणीचा हंगाम :
आंबिया बहार : जून – ऑगस्ट ,
मृग बहार : डिसेंबर – जानेवारी ,
हस्त बहार : मार्च – एप्रिल . कागदी लिंबाला जवळजवळ वर्षभर फळे मिळतात .
उत्पादन : कागदी लिंबू : मुख्य बहारापासून ४ ते ६ वर्षे – २०० ते ४०० फळे , ७ वर्षे व नंतर – ८०० ते १००० फळे , लेमन : ४ वर्षे व त्यानंतर – २०० ते ४०० फळे प्रति झाड .
आर्थिक आयुष्य : १५ ते २० वर्षे