गुलाब (फुलझाडांची लागवड)

 गुलाब  (फुलझाडांची लागवड)

गुलाब  (फुलझाडांची लागवड)
 गुलाब  (फुलझाडांची लागवड)

गुलाब एक बारमाही, झुडुपी, काटेरी, अत्यंत सुंदर सुवासिक फुलांची वनस्पती आहे. 

यामध्ये १०० हून अधिक प्रजाती आहेत, त्यापैकी बहुतेक आशियातील आहेत. 
काही प्रजातींचे मूळ प्रदेश युरोप, उत्तर अमेरिका आणि उत्तर पश्चिम आफ्रिका देखील आहेत. 
भारत सरकारने 12 फेब्रुवारीला ‘रोज-डे’ म्हणून घोषित केले आहे. 
गुलाबचे फूल त्याच्या मऊपणा आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, म्हणूनच लोक लहान मुलांना गुलाबाच्या फुलांशी तुलना करतात.(सोर्स wiki)

गुलाब :

हवामान : समशितोष्ण हवामानात गुलाबाची वाढ चांगली होते . तसेच मोकळी हवा , भरपूर सूर्यप्रकाश आणि मध्यम तापमान या पिकास चांगले मानवते .


जमीन
: उत्तम निचरा होणारी , पोयट्याची जमीन निवडावी . क्षारयुक्त , चोपण जमिनीत गुलाब चांगले बहरत नाही . जमिनीचा सामू ( पी.एच. ) ६.० ते ७.५ च्या दरम्यान असावा .

अभिवृद्धी : नील गुलाबावर नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यात डोळे भरून करावी .

पूर्वतयारी
: लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीची आडवी – उभी नांगरणी करून त्यातील हराळी व तणे वेचून काढावीत . त्यानंतर वखराच्या २-३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी .

नंतर जातीनुसार ६० * ६० सें.मी. अंतरावर ५० * ५० * ५० सें.मी. आकाराचे खड्डे खोदून पावसाळ्यापूर्वी कुजलेले शेणखत , पालापाचोळा व गाळाची माती टाकून खड्डे भरावेत . त्यासाठी हेक्टरी २७,७७७ झाडे लागतात .

लागवड
: कलमी गुलाबाची लागवड पावसाळ्यात करणे योग्य आणि सोयीचे आहे . लागवडीकरिता सप्टेंबर – ऑक्टोबर हा काळ सुद्धा उत्तम आहे . पुढे थंडीच्या काळात लागवड टाळावी .

खते : हेक्टरी एकूण ६०० किलो नत्र , २०० किलो स्फुरद व २०० किलो पालाश खालील प्रमाणे विभागून द्यावे .

जून छाटणी नंतर १५० किलो नत्र , १०० किलो स्फुरद व १०० किलो पालाश व त्यानंतर एक महिन्याने १५० किलो नत्र प्रती हेक्टरी द्यावे . नोव्हेंबर छाटणीनंतर सुद्धा वरील प्रमाणेच खते द्यावीत .

ओलीत : पावसाळ्यात पाणी नसताना १५ दिवसांनी , हिवाळ्यात १० ते १२ दिवसांनी आणि उन्हाळ्यात ५ ते ७ दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात .

जाती : गुलाबाच्या अनेक जाती आणि प्रकार पाहता मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून योग्य जातीची निवड करावी .

लाल
: पापा मिलांद , सोफिया लॉरेन्स , ख्रिश्चन डायर , एव्हान , मिस्टर लिंकन , क्रिमसन ग्लोरी , ग्लॅडिएटर , टोरो इत्यादी .

पिवळा : लांडोरा , गंगा , किंग्ज रॅमसन , सनकिंग , समर सनशाईन , होकोटू , माबेला , डच गोल्ड इत्यादी .

गुलाबी
: फर्स्ट प्राईज , क्विन एलिझाबेथ , मारिया कॅलस , फ्रेंडशीप , डॉ . बी.पी. पाल ,मृणालिनी , पीटर फॅकन फिल्ड ,

पांढरा : जॉन एफ केनेडी , व्हिगों , जवाहर , व्हाईट मास्टर पीस , पास्कली , गार्डन पार्टी डॉ . होमी भाभा , लुशियाना .

निळा व जांभळा : ब्ल्यू मून , लेडी एक्स , निलांबरी , पॅराडाईज .

केशरी : समर हॉलिडे , फोकलोर , लारा , सुपर स्टार

बहुरंगी : डबल डिलाईट , पीस , सी पर्ल , अमेरिकन हेरिटेज , लव्ह , अभिसारिका , टाटा

सुगंधित : ओकलाहोमा , सुगंधा , क्रिमसन ग्लोरी , अॅवान , आयफेल टॉवर , परफ्यूम डिलाईट . आपल्या भागात फोकलोर , रेड मास्टर पीस , सुपर स्टार , ग्लॅडिएटर , पॅराडाईज , टोरो , हॉनर , लव्हस्टोरी , लांडोर या जातीपासून फुलांचे चांगले उत्पन्न मिळत असून या जातीची फुले आकर्षक दिसतात .

आंतरमशागत : नियमित खुरपणी करून तणे काढावीत . मुळ्याजवळील माती मोकळी करणे महत्त्वाचे आहे . तसेच खुंटावरील फूट वेळोवेळी काढावी .

काढणी व हंगाम : फुले उमलण्यापूर्वीच सिकेटरने दांडीसहीत काढावी . फुले काढून त्यांचा टांडा पाण्यात ठेवल्यानंतर १ सें.मी.चा खालील भाग पाण्यातच कापावा .

छाटणी : आपल्या हातावरणात प्रामुख्याने जून व नोव्हेंबरमध्ये छाटणी करावी . हेक्टरी उत्पादन : गुलाबाचे जाती , वय व अंतरानुसार प्रती झाड प्रति वर्षी ५० ते ८० पुरालाचे उत्पादन मिळते

Leave a Comment