जट्रोफा – वनशेतीच्या दृष्टीने वनवृक्षांच्या लागवडीचे तंत्र

 वनशेतीच्या दृष्टीने वनवृक्षांच्या लागवडीचे तंत्र

जट्रोफा  - वनशेतीच्या दृष्टीने वनवृक्षांच्या लागवडीचे तंत्र
जट्रोफा  – वनशेतीच्या दृष्टीने वनवृक्षांच्या लागवडीचे तंत्र

जट्रोफा 

प्रचलित नाव : जट्रोफा , रत्नज्योत , मोगली एरंड 

शास्त्रीय नाव : जट्रोफा करकॅस 

हवामान : उष्ण कटिबंधीय प्रदेशात विविध हवामानात चांगले येते . 

जमिनीची निवड : जट्रोफाची लागवड बहुधा निकृष्ट प्रकारच्या जमिनीवर केली जाते . क्षारयुक्त / चोपण जमिनीत सुद्धा हे झाड वाढू शकते . भारी व उत्तम निचऱ्याच्या जमिनीत या झाडाची वाढ चांगली होते . उन्हाळ्यात एकदा नांगरणी करणे आवश्यक आहे . 

रोपांची लागवड : 

अ ) छाट कलमाद्वारे : रोपांची लागवड छाट कलमाद्वारे करता येते . छाट कलमे तयार करण्यासाठी एप्रिलचा शेवट किंवा मे च्या पहिल्या आठवड्यात मातृवृक्षापासून ४० सें.मी. लांबीची चालू वर्षाच्या वाढीपासून छाट कलमे तयार करावी . एक महिन्यानंतर मुळे झाल्यावर , शेतात पाऊस झाल्यानंतर लागवड करावी . 

ब ) बियाद्वारे : मागील वर्षी जमा केलेल्या बिया स्वच्छ करून पहिला पाऊस झाल्यावर , एका ठिकाणी दोन बिया टोकाव्यात . उगवण झाल्यावर , प्रत्येक ठिकाणी एक रोपटे ठेवावे . बियापासून तयार झालेली झाडे सुदृढ असून अधिक टिकतात व उत्पन्न उशीरा मिळते . पॉलिथीनच्या पिशव्यामध्ये बियाची लागवड करून रोपे तयार करता येतात . 

रोपांतील अंतर : हलक्या जमिनीत २४२ मीटर , भारी जमिनीत ३४३ मीटर 

आंतर मशागत : दोन वेळा डवरणी व दोन वेळा निंदणी करावी . 

ओलीत : या झाडाला कमी पाणी लागत असल्यामुळे फुलोरा येण्याच्या काळात पाऊस न आल्यास संरक्षित ओलिताचा फायदा होतो . 

कापणी : ह्या झाडाला वर्षातून दोन वेळा फळधारणा होते . झाडाला फळे पुष्कळ काळ टिकून राहत असल्यामुळे फळे काळी झाल्यावर कापणी करावी . डिसेंबर महिन्याच्या शेवटी पानगळ होऊन नवीन पाने एप्रिल महिन्यात येतात व फुलोरा जुलै महिन्यात सुरु होतो . 

उत्पादन : बियाणेद्वारा लागवड केल्यावर ३ ते ४ वर्षात फुलोरा येऊन प्रति झाड १ किलो बियाणे मिळते . बियाण्याच्या उत्पन्नात मशागती प्रमाणे व वयाप्रमाणे वाढ होते . 

उपयोग : या झाडाच्या बियांपासून ४० टक्के तेल मिळते . या तेलाचा उपयोग डिझेलला पर्यायी तेल म्हणून होतो . म्हणून भविष्यात या पिकाला चांगली मागणी राहणार आहे . तसेच बियांचे विविध उपयोग आहेत . शेतकऱ्यांनी या पिकाची नोंदणी पटवाऱ्याच्या खाते पुस्तकात करण्याची गरज नाही . हे बियाणे विषारी असल्यामुळे ते लहान मुले खाणार नाहीत याची संपूर्ण काळजी घ्यावी .

Leave a Comment