जवस पीक तंत्र linseed plant

 जवस  linseed plant

जवस पीक तंत्र
 जवस पीक तंत्र 

महाराष्ट्रात linseed plant जवसाचे पीक ९ ८ हजार हेक्टर , तर विदर्भात ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते . विदर्भातील थंड हवामान या पिकाकरिता उपयुक्त आहे .linseed plant या पिकाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित बियाण्याचा प्रमुख सहभाग आहे . महाराष्ट्रात या पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यात केल्यास चांगले उत्पादन मिळते . 

जमिनीची निवड व पूर्वमशागत : 

मध्यम ते भारी , ओलावा टिकवून ठेवणारी , उत्तम निचऱ्याची , आम्ल विम्ल निर्देशांक ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असणारी जमीन या पिकास योग्य ठरते . पूर्व मशागत करताना सर्वप्रथम जमीन नांगरून टाकावी . वखराच्या दोन पाळ्या देऊन पेरणीस योग्य करावी . शेवटच्या वखरणीला १० गाड्या चांगले कुजलेले शेणखत / कम्पोस्ट खत मिसळावे . 

पेरणीची वेळ : 

कोरडवाहू ऑक्टोबरचा पहिला पंधरवाडा . ओलिताखाली ऑक्टोबरचा दुसरा पंधरवाडा . पेरणी वेळेवर केली असता जवसावरील किडी व रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून येतो , त्यामुळे वेळेवर पेरणी अत्यावश्यक आहे .

 बियाण्याचे प्रमाण : हेक्टरी १२ ते १५ किलो .

linseed plant बीज प्रक्रिया : 

प्रति किलो बियाण्यास कार्बेन्डाझिम १.५ ते २ ग्रॅम किंवा थायरम ३ ते ३.५ ग्रॅम पेरणीपूर्वी चोळावे . यामुळे बियाद्वारे तसेच जमिनीद्वारे रोगाचा प्रभाव नियंत्रणात आणता येतो . 

सुधारित वाण : 

अधिक उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने सुधारित वाणांचा वापर करावा . पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणशक्ति तपासून पहावी .

पेरणी : 

जवसाची पेरणी मुख्यतः चाड्याच्या तिफणीने करावी . दोन ओळीतील अंतर २५ ते ३० सें.मी. असणे आवश्यक आहे . झाडांची प्रतिहेक्टरी संख्या ४.५ ते ५ लाख राहील याची दक्षता घ्यावी . पेरणीची खोली जमिनीत असलेल्या ओलाव्यावर अलंबून असते . पेरताना बियाणे योग्य ओलीत पडेल याची काळजी घ्यावी . 

आंतरपिके :

जवस पिकात linseed plant हरभरा व करडई ४ : २ ओळी या प्रमाणात किंवा जवस – मोहरी ५ : १ ओळी या प्रमाणात घेतल्याने चांगले निष्कर्ष प्राप्त झाले आहेत . 

रासायनिक खताची मात्रा : 

कोरडवाहू लागवडीस दर हेक्टरी २५ किलो नत्र व २५ किलो स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे . ओलिताखालील लागवडीसाठी हेक्टरी ६० किलो पर्यंत नत्राची मात्रा वाढविल्यास उत्पन्नात अपेक्षित वाढ होते.यापैकी अर्धा नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळेस व उरलेला अर्धा नत्र २०-२५ दिवसांनी पहिल्या ओलितासोबत द्यावा . 

आतरमशागत : 

पिकास पहिले २५ दिवस तणविरहीत ठेवल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते . पेरणीनंतर १५ दिवसांनी विरळणी व २० दिवसानंतर डवरणी व तद्नंतर निंदण करावे . 

काढणी व साठवण : 

पाने व बोंडे पिवळे पडल्यावर पीक काढणीस आले असे समजावे . झाडे हाताने उपटून किंवा विळ्याने जमिनीलगत कापून गोळा करावीत . ४-५ दिवस खळ्यावर वाळवावे . मळणी करावी व बी वाळवून साठवून ठेवावे . 

पीक संरक्षण : 

पिकास गादमाशीचा प्रादुर्भाव हमखास होतो . त्याची लहान अळी पांढुरकी व पूर्ण वाढलेली अळी शेंदरी रंगाची असते . तिला पाय नसतात . मादी कळ्यात अंडी घालते . अळी बिजांड फस्त करते व त्यामुळे फलधारणा होत नाही . बोंडे पोचट होऊन उत्पादनात घट येते . 

या किडीच्या नियंत्रणाकरिता डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मि.ली. , १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी  

linseed plant जवसाची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आटोपल्यास किडीवर नियंत्रण साधता येते . 

पिकावर तांबेरा व भूरी रोगाचा प्रादुर्भाव होतो . तांबेरा रोगाचे प्रसारण हवेद्वारे होते . रोगग्रस्त पानांवर खालच्या बाजूस तसेच खोडावर सुद्धा तांबूस नारिंगी रंगाचे ठिपके दिसून येतात . कालांतराने ते काळपट होतात . रोगाची तीव्रता वाढल्यास झाडाची पाने , फळे गळून पडतात व उत्पादनात घट येते . हे टाळण्याकरिता लागण दिसून येताच डायथेन एम – ४५ बुरशीनाशक २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . 

भूरी रोगाचाही प्रसार हवेद्वारे होतो . रोगाच्या सुरवातीस पानांच्या दोन्ही बाजूस लहान लहान पावडरी रंगाचे ठिपके येतात . हे ठिपके पुढे वाढत जाऊन संपूर्ण झाड भुरकट दिसू लागते . नियंत्रणाकरिता पाण्यात मिसळणाऱ्या गंधकाची भुकटी २५ ग्रॅम किंवा कॅराथेन १० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .

Leave a Comment