तुरीवरील किडींचे एकीकृत व्यवस्थापन

 तुरीवरील किडींचे एकीकृत व्यवस्थापन 

तुरीवरील किडींचे एकीकृत व्यवस्थापन
तुरीवरील किडींचे एकीकृत व्यवस्थापन 

तुरीवरील महत्त्वाच्या किडीमध्ये शेंगा पोखरणारी अळी ( घाटे अळी ) , शेगेवरील माशी , पिसारी पतंग आणि पाने गुंडाळणारी अळी यांचा समावेश होतो . यापैकी पहिले दोन किडीमुळे ते ९ ० टक्के नुकसान होत असल्याचे आढळून आले आहे . किडींच्या एकीकृत ( एकात्मिक ) व्यवस्थापनामध्ये खालील बाबींचा समावेश होतो . 

१. जमिनीची खोल नांगरणी : 

उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी केल्यामुळे जमिनीत असणाऱ्या किडींचे कोष कडक उन्हामुळे अथवा नांगरणीमुळे मरतात , तसेच पक्षांचे भक्ष्य ठरतात . 

२. आंतरपिके : 

तुरीसोबत ज्वारी , बाजरी , मका ही आंतरपिके घेतल्यास किडीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाची काही प्रमाणात भरपाई होते . 

३. वनस्पतीजन्य किटकनाशकांचा वापर : 

घाटेअळीसाठी निंबोळीच्या पाच टक्के अर्काची फवारणी केल्यास , परोपजीवी किटकांना अभय मिळते . या अर्कासोबत एन्डोसल्फान अथवा मोनोक्रोटोफॉसची अर्धी मात्रा वापरल्यास ते जास्त प्रभावी ठरते आणि किडीचे सुद्धा नियंत्रण होते . 

४. जैविक नियंत्रण : 

घाटेअळीचा प्रादुर्भाव आढळल्यास घाटेअळीच्या विषाणूचा ( एचएएनपीव्ही ) वापर प्रभावी व उपयुक्त दिसून आला आहे .

५. रासायनिक किटकनाशकांचा वापर : 

तुरीवर घाटेअळीच्या आर्थिक नुकसानीची पातळी १ २ अळ्या प्रती झाड किंवा ५ टक्के शेंगांचे नुकसान आहे . तसेच पिसारी पतंगाच्या ५ ते १० अळ्या प्रती १० झाडावर असल्यास किटकनाशकाचा वापर करणे आवश्यक ठरते .

Leave a Comment