तेलबिया पिकांकरीता महत्त्वपूर्ण बाबी

तेलबिया पिकांकरीता महत्त्वपूर्ण बाबी

तेलबिया पिकांकरीता महत्त्वपूर्ण बाबी
तेलबिया पिकांकरीता महत्त्वपूर्ण बाबी 

>तेलबिया पिकांना जिप्समचा वापर करणे फायदेशीर ठरते .
>तेलबिया पिकांना प्रथम बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी . सोयाबीन व भुईमूगास त्यानंतर    जीवाणू संवर्धन लावावे . 
>तेलबियांचे पिकांकरीता रासायनिक खताची मात्रा अमोनियम सल्फेट आणि सिंगल सुपर फॉस्फेटमधून दिल्यास नत्र व स्फुरदाव्यतिरिक्त गंधक आणि कॅलशियम पिकास मिळून तेलाची प्रत सुधारते तसेच दाणा ठसठशीत भरतो .
>भुईमूगाची मान्सूनपूर्व पेरणी करावी किंवा योग्य पाऊस झाल्यावर लवकरात लवकर पेरणी संपवावी . 
>सूर्यफुलाला किरणपुष्पे उमलण्याच्यावेळी फक्त फुलावर बोरॅक्स २० ग्रॅम , १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा फुलोरा अवस्थेत हस्तपरागीकरण करावे .
>मावा किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी करडईची पेरणी सप्टेंबरच्या शेवटच्या ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्या दरम्यान करावी .
>करडई पिकावरील मर रोगाचे नियंत्रणकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ट्रायकोडर्मा ह्या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रती किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी .
>उन्हाळी हंगामात भुईमूगाची संपूर्ण उगवण झाल्यावर फुलोऱ्यापूर्वी पाण्याचा ताण दिल्यास फायदा होतो .
>तेलबिया पिकांना फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत ओलीत करावे .


Leave a Comment