द्राक्षे शेतीतंत्र (farming of grapes)

 द्राक्षे शेतीतंत्र  (farming of grapes)

द्राक्षे शेतीतंत्र  (farming of grapes)
द्राक्षे शेतीतंत्र  (farming of grapes)

जमीन : 

मध्यम ते हलक्या प्रतीची आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी . चुनखडीयुक्त , चोपण किंवा पाणी धरून ठेवणारी जमीन निवडू नये . 

जाती : 

बिन बियाच्या : थॉमसन सीडलेस , ताश – ए – गणेश , सोनाका , माणिक चमन , किसमिस चोरनी . बियाच्या : अनाबेशाही , काळी साहेबी , ब्लॅक राऊंड , कंदाहारी . 

अभिवृद्धी : छाट कलमाद्वारे

लागवडीचे अंतर : ३.० * १.५ मीटर , २२०० वेली प्रती हेक्टर किंवा ३.०० * १.४ मीटर , २३८० वेली प्रती हेक्टर किंवा २.४ * १.८ मीटर , २३१४ प्रती हेक्टर किंवा २.४  *  १.५ मीटर , २७७७ वेली प्रती हेक्टर . 

लागवड : जमिनीच्या उतारास आडवे आणि शक्यतो दक्षिणोत्तर ( ५० ते ७५ सें.मी. खोल व रुंद ) चर खोदून ते योग्य प्रकारे भरून जानेवारी – फेब्रुवारीमध्ये लागवड करावी

वळण : मांडव पद्धत ही द्राक्ष वेलीला वळण देण्यासाठी योग्य आहे . सुरूवातीला मंडप तयार करणे आणि वेलीला वळण देणे ही कामे महत्त्वाची आहेत . 

खत : पूर्ण वाढ झालेल्या बागेला हेक्टरी ९ ० ते १०० गाड्या शेणखत , ९ ०० कि . नत्र , ५०० कि . स्फुरद व ७०० किलो पालाश द्यावा . खते खालीलप्रमाणे विभागून द्यावीत 

अनु.
क्र.
वेळ       नत्र  ( कि.प्र.हे. )     स्फुरद  ( कि.प्र.हे. )   पालाश ( कि.प्र.हे. )
१.  मार्च – एप्रिल   ५४० २५० —-
२. मे —- —- २८०
३. सप्टेंबर आक्टाबर    १८०  २५० २१०
4. नोव्हेंबर  १८०  —- २१०

पाणी पुरवठा : जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याच्या ४० ते ४५ पाळ्या द्याव्यात . ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास पाण्याची बचत होऊन वेलीची वाढ चांगली होते . 

छाटणी : 

१ ) एप्रिल छाटणी ( खरड छाटणी ) 

२ ) ऑक्टोबर छाटणी ( फळ छाटणी 

फळे तोडणीचा हंगाम : फेब्रुवारी – मार्च 

उत्पादन : १० ते १५ किलो प्रती वेल 

 आयुष्य : वन १० ते १२ वर्षे

शुद्ध बीजापोटी ….. फळे रसाळ गोमटी ….

Leave a Comment