१ ) खोडकिडा :
खोडकिड्याच्या बंदोबस्ताकरिता –
१ ) खोडकिडा प्रतिकारक धानाच्या जाती वापराव्यात .
२ ) रोवणीपूर्वी रोपांची मुळे क्लोरपायरीफॉस २० टक्के प्रवाही १० मि.ली. १० लिटर पाण्याच्या द्रावणात १२ तास बुडवून ठेवावीत व नंतर रोवणी करावी .
३ ) धानाची कापणी जमिनीलगत करावी .
४ ) धान कापणीनंतर वापसा आल्यावर नांगरणी करून धसकटे गोळा करावी व जाळून टाकावी .
५ ) शेतात ५ % कीडग्रस्त काड्या दिसताच फेनिट्रोथीऑन १६ मि.ली. , क्विनॉलफॉस ३२ मि.ली. , फेन्थोएट १६ मि.ली. प्रती १० लिट पाणी या प्रमाणात कोणतेही एक किटकनाशक फवारावे .
२ ) गादमाशी :
१ ) प्रतिकारक जातीचा वापर करावा .
२ ) बांधावरील पूरक वनस्पतीचा ( जसे देवधान ) नाश करावा .
३ ) कीडग्रस्त रोपे काढून नष्ट करावीत .
४ ) गादमाशीचा प्रादुर्भाव दिसताच दाणेदार फोरेट १० टक्के १० किलो किंवा क्विनॉलफॉस ५ टक्के १५ किलो प्रती हेक्टरी बांधीमध्ये ७ ते १० सें.मी. ( ३ ते ४ इंच ) पाणी असताना वापरावे . ही किटकनाशके आवश्यकतेनुसार ३० दिवसांनी परत वापरावीत . बांधीतील पाणी चार दिवसपर्यंत बांधीबाहेर काढू नये .
३ ) तुडतुडे :
१ ) तपकिरी तुडतुड्यांना प्रतिकारक असलेल्या जातीची लागवड करावी .
२ ) रोपे अतिशय दाट लावू नयेत .
३ ) नत्र खताची वाजवीपेक्षा जास्त मात्रा वापरू नये .
४ ) ४-५ तुडतुडे एका चुडावर दिसताच मॅलाथिऑन ५० टक्के प्रवाही २० मि.ली. किंवा फेनिट्रोथिऑन ५० टक्के १० मि.ली. किंवा फेन्थोएट ५० टक्के १० मि.ली. किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही १४ मि.ली. एक किटकनाशक १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा कार्बारील १० टक्के भुकटी २० किलो प्रती हेक्टरी याप्रमाणे हवा शांत असताना धुरळावी .
४ ) लष्करी अळी :
या किडीच्या नियंत्रणासाठी मिथील पॅराथिऑन भुकटी २ टक्के प्रती हेक्टरी २० किलो या प्रमाणात सायंकाळच्या वेळी धुरळावी किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही १४ मि.ली. किंवा कार्बारील ५० टक्के २० ग्रॅम किंवा सायपरमेथ्रिन १० टक्के ६ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .
५ ) पाने गुंडाळणारी अळी :
पाने गुंडाळणारी अळी , बेरड , सुरळीतील अळी व शिंगे अळी यांच्या नियंत्रणासाठी मोनाक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही १४ मि.ली. किंवा मॅलॉथिऑन ५० टक्के प्रवाही ३० मि.ली. किंवा कार्बारील ( मा.मि. भुकटी ) २० ग्रॅम किंवा फेनिट्रोथिऑन ५० टक्के १५ मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .
१ ) करपा व पानावरील ठिपके
या रोगाच्या नियंत्रणासाठी ३ % मिठाच्या पाण्यातून काढलेले जड बी तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवावे व त्यानंतर थायरम ३ ग्रॅम अथवा कार्बेन्डाझीम २ ग्रॅम प्रती किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे .
२ ) कडाकरपा :
३ टक्के मिठाच्या द्रावण्याची प्रक्रिया वरीलप्रमाणे करून जड बियाणे एक ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लीन + १० लिटर पाण्यात २ तास बुडवून सावलीत वाळवावे व नंतर प्रती किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम चोळावे . कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन ०.५ ग्रॅम + १० लिटर पाण्याच्या मिश्रणाचा फवारा व्यवस्थित पडेल अशा रितीने लावणीनंतर १० दिवसाच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात .
३ ) आभासमय काजळी :
१ ) या रोगाच्या नियंत्रणासाठी वरीलप्रमाणे तीन टक्के मिठाच्या पाण्याची बीज प्रक्रिया करावी आणि बियाला थायरम तीन , ग्रॅम प्रती किलो बियाणे औषध चोळून पेरणी करावी .
३ ) शेतात रोग आढळल्यास रोगट लोंब्या काढून नष्ट कराव्यात .
१ ) योग्य बियाण्याची निवड :
कीड प्रतिकारक वाणाची निवड करावी .
प्रतिकारक वाण – गादमाशी साकोली ८ , सुरक्षा , सिंदेवाही २००१
खोडकिडा – साकोली ८
तुडतुडे : साकोली ८ , सिंदेवाही २००१
( शक्यतोवर शिफारस केलेले प्रमाणित व निरोगी बियाणे वापरावे . )
२ ) बीज प्रक्रिया :
बियाण्याला मिठाचे द्रावण , बुरशीनाशक तसेच जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करावी .
३ ) मशागतीय पद्धती :
अ ) पेरणीपूर्वी – खोडकिडा व तुडतुड्यापासून संरक्षण करण्यासाठी लवकर पक्व होणारे वाण ( साकोली -६ , सिन्देवाही -१ ) वापरावे . तसेच पावसाळा सुरु होताच शक्यतोवर लवकर पेरणी करावी आणि रोप तणमुक्त ठेवावे .
ब ) रोवणीच्या वेळी : चिखलणीच्या वेळी नत्र खताची संतुलित मात्रा टाकावी . गादमाशी व खोडकिडीपासून बचाव करण्यासाठी क्लोरपायरीफॉस २० टक्के प्रवाही १० मि.ली. , १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून त्यात रोपमुळे १२ तास बुडवावी . रोपांची लावणी योग्य अंतरावर केल्यास तुडतुड्यांची वाढ रोखण्यास मदत होते . त्याचप्रमाणे पुनर्लावणी सामुहिकपणे ३-४ आठवड्यात आटोपावी .
क ) पीक वाढ अवस्था : शेत व लगतचे बांध तणमुक्त ठेवावे . दुबार धान पीक पद्धतीत दोन हंगामामध्ये धानमुक्त काळ ठेवावा म्हणजे किडीची वाढ खंडीत होईल.
४ ) पाणी व्यवस्थापन :
अ ) रोपवाटिकेत आवश्यकतेपेक्षा जास्त ओलावा ठेवू नये .
ब ) सुरळ्यातील अळी व तुडतुडे यांचा प्रादुर्भाव झाल्यास बांधीतील पाणी ३ ते ४ दिवसासाठी बाहेर सोडावे .
क ) लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यास बांधीत पाणी भरावे .
५ ) यांत्रिक पद्धती :
अ ) मित्र किटकांचे अंडीपूंज गोळा करून बांबूच्या सापळयात टाकावेत म्हणजे अंड्यातून यथावकाश परोपजीवी किटक बाहेर पडतील .
ब ) पिकावरून दोर किंवा झाडाच्या फांद्या आडव्या फिरवून पाने गुंडाळणाऱ्या व लष्करी अळ्या पाडाव्यात .
क ) किडग्रस्त रोपे व फुटवे उपटून अळ्यांसह नष्ट करावीत .
६ ) जैविक नियंत्रण :
किटकनाशकांची अनावश्यक फवारणी टाळून भक्षक व इतर परोपजीवी किटकांचे संवर्धन व संरक्षण करावे . ट्रायकोग्रामा परोपजीवी किटक उपलब्ध असल्यास त्यांचा वापर करावा . धान खाचरातील पाण्यात बेडकांचे जतन करावे . त्यामुळे काही किडींचा बंदोबस्त होईल .
वरील सर्व उपाय योजूनही हानिकारक किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ( तपकिरी तुडतुडे : प्रति चुडा ५ ते १० पिल्ले , खोडकिडा : ५ ते १० टक्के पोंगेमर , गादमाशी : ५ टक्के किडग्रस्त फुटवे ) आढळून आल्यास धान पिकांतर्गत दिलेल्या किटकनाशकांचा आवश्यकतेनुसार वापर करावा.
७). उंदीर नियंत्रण :
अ ) खोल नांगरट करावी .
ब ) बांधाची छटाई करावी .
क ) उंदराची बिळे आढळून आल्यास ती बुजवून टाकावी .