नागपूर संत्रा व मोसंबी फळझाडांची लागवड

नागपूर संत्रा व मोसंबी फळझाडांची लागवड

नागपूर संत्रा व मोसंबी फळझाडांची लागवड
नागपूर संत्रा व मोसंबी फळझाडांची लागवड

जमीन : 

मध्यम काळी , सुमारे एक ते दीड मिटर खोल व त्याखाली कच्चा मुरूम वा गाळाची , उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी .मोसंबीला संत्र्यापेक्षा काही प्रमाणात हलकी जमीन योग्य ठरते . जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण १० टक्केच्यावर असू नये .

लागवडीचा हंगाम : 

मुख्यत्वे पावसाळ्यात चौरस पद्धतीने , अंतर ६*६ मीटर ( हेक्टरमध्ये २७७ झाड ) , खड्डयाचा आकार १*१*१ मीटर .

जाती :

            संत्रा : ना गपूर संत्रा , नागपूर सिडलेस , मुदखेड ( कमी बियांचा ) , किनो .

            मोसंबी: न्यूसेलर, नगर .

खूंट : जंबेरी किंवा रंगपूर खुंटावरील कलमे निवडावी .

पाणी पुरवठा : दहा वर्षे व त्यावरील वयाच्या झाडांना दरवर्षी पाण्याच्या २८ ते ३० पाळ्या लागतात . दुहेरी आळे पद्धतीने पाणी द्यावे . पाणी टंचाईत ४ दांड पद्धत वापरावी , शक्य असेल तर ठिबक सिंचनाचा अवलंब करावा .

वळण व छाटणी : लहान वयाच्या झाडांना एक खोड पद्धतीने वाढवावे व त्यानुसार वळण द्यावे . मोठ्या झाडावरील सल दरवर्षी फळ उतरल्यावर काढावी . पानसोट नेहमी काढावेत . सल काढल्यावर कापलेल्या भागावर बोडौंमलम लावावा .

आंतरपिके : सुरूवातीचे ३-४ वर्षे ( फळधारणा होण्यापूर्वी ) आंतर पीक घ्यावे . पहिले वर्षी ठेगणी , कमी कालावधीची भाजीपाला , हिरवळीची वा कडधान्याची पिके घ्यावीत . पुढे हिरवळीचे पीक घ्यावे . निंदण किंवा योग्य तणनाशक वापरून आळे स्वच्छ ठेवावेत . कपाशीचे आंतर पीक घेऊ नये .

बहार धरणे : बहार धरण्यासाठी मृग / आंबिया फुलोरापूर्वी जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडाचे वय व ताकद पाहून ताण द्यावा . मृग – मध्यम प्रकारच्या जमिनीत संत्र्याच्या झाडाना ५० दिवसाचा ताण द्यावा .

फळगळ : आंबिया बहारातील फळांची गळ ऑगष्ट ते ऑक्टोबर या काळात होते . ती कमी करण्यासाठी या काळात प्रत्येक महिन्यात २-४ डी किंवा एन.ए.ए .१० पी.पी.एम. ( १० मिलीग्रॅम संजीवक प्रति लिटर पाणी ) अधिक युरिया १ टक्का ( १० म युरिया पति लिटर पाणी ) या तीव्रतेच्या संजीवकाचा फवारा द्यावा . फळधारणा होण्याच्या कालावधीत बागेची खोल मशागत करू नये .

खोडाला मलम लावणे : जून व ऑक्टोबरमध्ये झाडाला १ मीटर उंचीपर्यंत बोडौंमलम ( १ : १ : १० ) लावावा .

हंगाम : 

            आंबिया बहार : फुलोरा : जाने . – फेब्रु . , व काढणी : नोव्हेंबर – डिसेंबर .

            मृग बहार :: फुलोरा : जून – जुलै व काढणी : फेब्रुवारी – मार्च . उन्हाळ्यातील फळगळ कमी करण्याकरिता बागेत आच्छादन करावे .

उत्पादन :
५ ते ८ वर्षे , संत्रा -१५० ते ४०० फळे , मोसंबी ते ३०० फळे प्रति झाड . ९ वर्षे व पुढे , संत्रा ५०० ते ८०० फळे , मोसंबी – ४०० ते ६०० फळे प्रति झाड ,

आर्थिक आयुष्य : १८ ते २५ वर्षे .

संत्र्याच्या जुन्या बागांचे पुनर्जीवन 


संत्र्याच्या जुन्या झाडांचे ( १५ वर्षे वयापेक्षा जास्त ) शास्त्रीय उपाययोजना करून पुनर्जीवन करता येते व अशा झाडांचे आयुष्य वाढून त्यापासून चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळते . त्याकरिता खालीलप्रमाणे उपाययोजना करावी . 
१. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ( पाऊस सुरू होण्यापूर्वी ) झाडावरील सर्व वाळलेल्या व रोगट फांद्या काढून टाकाव्यात . मध्यम व मोठ्या वाळलेल्या फांद्या आरीने कापून काढाव्यात . हिरव्या फांद्या सुद्धा शेंड्यापासून ४५ सें.मी. लांबीच्या छाटाव्या . 
. वरील प्रमाणे छाटणी केल्यानंतर झाडावर किटक व बुरशीनाशकाची फवारणी करावी . 
. झाडाच्या बुंध्याला व छाटलेल्या जागी बोडोंमलम ( १ : १ : १० ) लावावा 

४. छाटणीनंतर प्रत्येक झाडाला ५० किलो शेणखत + ७.५ किलो निंबोळीची ढेप झाडाच्या परिघात मातीत मिसळून द्यावी 
. ऑक्टोबर महिन्यात या झाडांना प्रत्येकी ५०० ग्रॅम नत्र + ५०० ग्रॅम स्फुरद द्यावा . 
६. पुढील वर्षापासून शिफारसीनुसार खताच्या मात्रा देऊन किटक व बुरशीनाशकाची फवारणी करावी . 
.संत्रा झाडाची छाटणी एकदाच करावी . दरवर्षी करू नये . 
 
. संत्र्याच्या जुन्या ( १५ वर्षाच्यावर वय असलेले ) झाडाची छाटणी करावी . नवीन झाडाची छाटणी करू नये . 

 

Leave a Comment