पपई लागवड तंत्र (Papaya cultivation techniques)

 

पपई लागवड तंत्र (Papaya cultivation techniques)

पपई लागवड तंत्र (Papaya cultivation techniques)
पपई लागवड तंत्र (Papaya cultivation techniques)


जमीन :

मध्यम काळी उत्तम निचऱ्याची जमीन योग्य ठरते . पाणी साचल्यास मूळ , खोड सडून रोग होतो .

जाती :

सी.ओ. – १ , सी.ओ. – २ ( पेपेनसाठी ) , कूर्ग हनीड्यू , वॉशिंग्टन , पुसा डेलिशिअस , सी.ओ. – ५ ( पेपेनसाठी ) , सी.ओ. – ६ , सी.ओ. – ७ .

अभिवृद्धी :

बियापासून ६ ते ७ आठवड्यांची रोपे लावावीत . त्याकरिता जून – जुलै महिन्यात पॉलिथीन पिशवीमध्ये बी टोकून रोपे तयार करावीत . एक हेक्टरसाठी २०० ते ४०० ग्रॅम बियाणे लागते .

अंतर व लावणी : २.५* २.५ मीटर दोन रोपात व ओळीत अंतर ठेवावे . हेक्टरी १६०० झाडे बसतात . उभयलिंगी जातींचे प्रत्येक ठिकाणी एकच रोप लावावे . इतर जातींमध्ये ( एक लिंगी ) ३ रोपे लावावीत . नंतर १० टक्के नराची झाडे ठेवावीत ( इतर नर झाडे काढून टाकावीत ) . पुढे प्रत्येक जागी मादीचे एक झाड राखावे . लागवड ऑगष्ट सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर कमी झाल्यावर करावी . मध्यम व हलक्या जमिनीवर २४२ मीटर अंतर ठेवावे . हेक्टरी २५०० झाडे बसतात .

पाणी पुरवठा : ३५ ते ४० पाण्याच्या पाळ्या लागतात .

निगा : पपईचे आळ्यात बुंध्याजवळ पाणी साचू देऊ नये . किडी , रोगाचे नियंत्रण करावे .

काढणी : रोप लागवडीपासून पाच महिन्यानी फुले येतात . लावणीनंतर दहा – बारा महिन्यांनी फळे काढणीस तयार होतात .

फुलोर व फळे तोडण्याचा हंगाम : फुलोर : जानेवारी – फेब्रुवारी , तोडणी : जून जुलै , सप्टेंबर – डिसेंबर .

उत्पादन : ३० ते ७० फळे ( ४० ते ५० किलो ) प्रति झाड .

पेपेन उत्पादन : ७५ ते ९ ० दिवस वयाच्या तयार कच्च्या फळापासून पेपेन काढतात . पहिल्या वर्षी सुमारे २०० किलो व दुसरे वर्षी १०० किलो पेपेन प्रती हेक्टरी मिळू शकते . सी.ओ. -२सी.ओ. – ५ या जाती पेपेनकरिता उपयुक्त आहेत .

Leave a Comment