पपई व्यवस्थापन तंत्र

 पपई व्यवस्थापन

पपई व्यवस्थापन  तंत्र
पपई व्यवस्थापन  तंत्र


 • पपईचे रोप दिड ते दोन महिन्याचे झाल्यानंतर जाड बुध्याचे निवडून सरळ लावावे . लागवडीचे अंतर ८४६ फुट ठेवावे . 

. रासायनिक खते प्रति झाडास एकूण नत्र २५० ग्रम , स्फुरद २५० ग्रॅम , पालाश २५० ग्रॅम अशी मात्रा समान ६ हप्त्यात विभागून द्यावी पहिली मात्रा लावणीनंतर १५ ते २० दिवसांनी व नंतरच्या प्रत्येक मात्रा ३० दिवसांनी द्याव्यात . तसेच लावणीनंतर ८ ते १० दिवसांनी प्रत्येक झाडाला ट्रायकोडरमा टाकावे . ( म्हणजे प्रति झाड एकूण १ किलो १०:२६:२६ + ४०० ग्रॅम युरिया ६ हप्त्यात विभागून द्यावा . खत बुंध्यापासून थोडे दुर टाकावे . ) 

• पपईच्या पिकावर जास्त प्रमाणात व्हायरस येऊ नये म्हणून पीक एक महिन्याचे व तीन महिन्याचे असताना त्यावर १ लीटर गाईचे दूध १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे . 

.लागवणीनंतर तीन ते साडेतीन महिन्यांनी १ लीटर पाण्यात अर्धा मि.ली / लिव्होसीन + २ ग्रॅम कार्बनडायझीम किंवा रिडोमील टाकून हे द्रावण प्रत्येक झाडाला अर्धा लीटर प्रमाणे मुळाशी टाकावे . 

• पीक साडेचार ते पाच महिन्याचे असतांना परत एकदा लिव्होसीन १ मि.ली. १ लीटर पाण्यात + कार्बनडायझीम किंवा रिडोमील २ ग्रॅम १ लीटर पाण्यात मिसळून अर्धा लीटर द्रावण मुळाशी टाकावे . 

• पीक फुलोऱ्यावर आल्याबरोबर पावर – बी १०० लि . पाण्यात १५० गॅम ची फवारणी करावी , १५ दिवसांनी इथ्रील १०० पी.पी.एम. फवारावे . 

• फलांची गळ कमी करण्याकरीता प्लॅनोफिक्स ( ५ मि.ली. ) + युरिया ( १०० ग्रॅम ) १० लि . पाण्यात मिसळून फवारणी करावी . 

• फळे चेंडुच्या आकारची झाल्यानंतर त्यावर पॉवर – बी + प्लान्ट डाईट +0 : ५२ : ३४ ची फवारणी करावी . 

• पिकावर केवडा रोग तसेच तुडतुडे , फुलकिडे ह्यांच्या नियंत्रणाकरिता मोनोक्रोटोफॉस + कॉपर ऑक्झीक्लोराईड + स्ट्रेप्टोसायक्लीन + प्लान्ट डाईट च्या १-२ फवारण्या कराव्या . 

• पपईच्या कडेला उंच वाढवणारी शेवरी लावावी.पपईच्या एका एकरात किमान ८०० ते १००० मक्याची झाडे लावावी म्हणजे पपई वरील तुड तुड़े मक्यावर जातील . 

Leave a Comment