बांबू – वनशेतीच्या दृष्टीने वनवृक्षांच्या लागवडीचे तंत्र

वनशेतीच्या दृष्टीने वनवृक्षांच्या लागवडीचे तंत्र 

बांबू  - वनशेतीच्या दृष्टीने वनवृक्षांच्या लागवडीचे तंत्र
 बांबू  – वनशेतीच्या दृष्टीने वनवृक्षांच्या लागवडीचे तंत्र 

बांबू 

प्रचलित नांव : बांबू 

शास्त्रीय नाव : डेंड्रोकॅलामस स्ट्रिक्टस . 

हवामान : शुष्क ते दमट , पर्जन्यमान ७५० ते ५००० मि.मी. 

जमिनीची निवड : गाळाची , रेती मिश्रित गाळाची व उत्तम निचऱ्याच्या भुसभुशीत जमिनीत बांबूची वाढ चांगली होते .

 रोपाची लागवड : उन्हाळ्यात खोदून ठेवलेल्या व चांगली माती व शेणखताच्या मिश्रणाने भरून ठेवलेल्या ४५*४५*४५ सें.मी. आकाराच्या खड्डयात रोपांची पावसाळ्यात लागवड करावी . 

रोपातील अंतर : बांबूची लागवड ५*५ मीटर अंतरावर करावी . या पद्धतीने हेक्टरी ४०० झाडे बसतात . 

आंतरमशागत : सागाप्रमाणे आंतरमशागत करावी . 

ओलीत : कोरडवाहू लागवडीत बांबूच्या बेटात फक्त पावसाळ्यातच नवीन बांबू येतात . त्यास ओलीत दिल्यास वर्षभर नवीन बांबू निघत राहतात व बांबूची संख्या वाढत राहते . वर्षभर ओलिताची सोय असल्यास बांबूचे कोरडवाहूपेक्षा ३ ते ५ पटीने जास्त उत्पादन येते . त्याकरिता ओलीत उपलब्ध असल्यास द्यावे . 

कापणी : बांबूची कापणी लागवडीनंतर चवथ्या वर्षापासून करता येते . बांबूचे आयुष्य ३५ वर्षाचे असल्याने तोपर्यंत बांबूची कापणी करता येते . फक्त पक्व व पिवळे झालेले बांबू काढावेत . 

उत्पादन : कोरडवाहूमध्ये प्रत्येक बांबू बेटापासून ४ ते ५ बांबू दरवर्षी मिळतात . ओलितामध्ये १५ ते २० बांबू दरवर्षी मिळू शकतात . 

उपयोग : बासे , लहान इमारतीमाल , मृदसंधारण , कागदाच्या लगद्यासाठी , कुटीर उद्योग , पाल्यापासून गुरांना चारा इत्यादी .

Leave a Comment