बाजरी लागवड
बाजरी हे कमी कालावधीत तयार होणारे व पाण्याचा ताण सहन करू शकणारे एक आशादायी पीक आहे .
 |
बाजरी लागवड |
जमीन :
पाण्याचा चांगला निचरा होणारी , हलकी ते मध्यम जमीन या पिकासाठी योग्य होय .
पूर्वमशागत व भरखते :
जमीन साधारणतः १५ सें.मी. पर्यंत खोल नांगरावी व २ ते ३ वेळा वखरणी करून शेत तयार करावे . पूर्वमशागतीचे वेळी १० ते १५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कम्पोस्ट खत प्रती हेक्टरी शेतात टाकावे .
शिफारशीत संकरीत व सुधारित जाती :
१. श्रद्धा ( आरएचबीएच ८६० ९ )
परिपक्व कालावधी ७० ते ८० दिवस , केवडा रोग प्रतिकारक , २५ क्विंटल धान्य व ५ टन चारा उत्पादन / हेक्टर .
२. सबुरी ( आरएचआरबीएच – ८ ९ २४ )
परिपक्व कालावधी ७५ ते ८० दिवस , कणसावर केस असल्यामुळे पक्षांचा त्रास कमी , केवडा प्रतिकारक , ३० क्विंटल धान्य व ५ टन चारा उत्पादन / हेक्टर .
३. आयसीटीपी – ८२०३
परिपक्व कालावधी ७० ते ८० दिवस , ठोकळ दाणा , बाजारात चांगली मागणी , १ ९ क्विंटल धान्य व ४ टन चारा उत्पादन / हेक्टर .
हेक्टरी बियाणे – पेरणीसाठी हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे .
बीज प्रक्रिया :
पेरणीपूर्वी बियाण्यास २० टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया ( २ किलो मीठ + १० लिटर पाणी ) आवश्यक आहे . पाण्यात तरंगणारे हलके बी काढून नष्ट करावे . खाली बुडालेले बी पाण्याने स्वच्छ धुऊन सावलीत वाळवून पेरणीसाठी उपयोगात आणावे .
पेरणीपूर्वी ६ ग्रॅम मेटॅलॅक्झील प्रति किलो बियाण्यास चोळून नंतर पेरणी करावी.
पेरणीची वेळ :
मान्सूनचा पुरेसा पाऊस झाल्यानंतर १५ जून ते १५ जुलैपर्यंत पेरणी करावी .
पेरणीची पद्धत :
दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. व दोन रोपातील अंतर १० ते १२ सें.मी. ठेवावे . पेरणी २ ते ३ सें.मी. खोल करावी . सर्व शेतात समप्रमाणात बियाण्याची विभागणी खातात .होण्याकरिता पेरणीपूर्वी बियाण्यात कोरडी वाळू मिसळावी
. विरळणी :
रोपांची विरळणी पेरणीनंतर १० ते १५ दिवसांनी करावी . एका ठिकाणी एकच जोमदार रोप राखावे .
खाडे भरणे :
भरपूर ओलावा असताना विरळणीची जवळपास २ ते ३ आठवड्याची रोपे खांडण्या भरण्याकरिता आवश्यकतेनुसार उपयोगात आणावीत .
रासायनिक खताची मात्रा , वेळ :
हलकी जमीन – ४० किलो नत्र + २० किलो स्फुरद / हेक्टर
मध्यम जमीन – ६० किलो नत्र + ३० किलो स्फुरद / हेक्टर
आंतरमशागत :
पेरणीनंतर ३० दिवसांपर्यंत दोन डवरण्या व दोन खुरपण्या देऊन शेत तणविरहीत राहील याची काळजी घ्यावी . ४५ दिवसानंतर पिकात डवरणी अथवा खुरपणी करू नये ,
आंतरपीक / दुबार पीक :
बाजरी + तूर या आंतरपिकात जोड ओळ पद्धतीत ३० सें.मी. अंतर ठेवून ओळीचे प्रमाण २ : १ किंवा ४ : २ ठेवावे . रबी हंगामात हरभरा , करडी , सूर्यफूल यासारखी पिके घेता येतात .
किडी व त्यांचे व्यवस्थापन
१ ) खोडमाशी : शरीरावर काळे ठिपके असतात . खोडामध्ये शिरून आतील भाग खाते , त्यामुळे शेंडा वाळतो . नियंत्रणासाठी खरीप हंगामात लवकरात लवकर पेरणी करावी . किडीचा जास्त प्रमाणात उपद्रव झाल्यास एन्डोसल्फान ३५ टक्के प्रवाही १४ मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .
३ ) सोस किंवा हिंगे : हिंगे काळ्या किंवा हिरव्या रंगाचे असून त्यांच्या शरीरावर पट्टे असतात . हे किडे बाजरीचे पीक फुलोऱ्यात असतांना सकाळच्या वेळी पुंकेसर त्यामुळे कणसाचा बराच भाग दान्यांनी भरत नाही . याकरिता सकाळचे वेळी वारा शांत असताना कणसावर कार्बारील १० टक्के भुकटी हेक्टरी २० किलो या प्रमाणे धुरळावी .
रोग व त्यांचे व्यवस्थापन
१ ) केवडा किंवा गोसावी : प्रसार बियाण्याद्वारे व हवेद्वारे होतो . सुरुवातीस पाने फिक्कट पिवळी होतात व पानाचे खालील भागात बुरशीची पांढरी वाढ दिसते . या अवस्थेला ‘ केवडा ‘ म्हणतात . पुढे पाने लालसर होतात , फाटतात व वाळतात . झाडाची वाढ खुंटते . कणसात दाणे भरण्याऐवजी कणीस केसाळ होते . याला ‘ गोसावी ‘ अवस्था म्हणतात .
मेटॅलॅक्सील हे आंतरप्रवाही बुरशीनाशक २.५ ग्रॅम क्रियाशील घटक प्रती किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे . बिजोत्पादन क्षेत्रामध्ये पीक ४० दिवसाचे असताना या औषधाची फवारणी करावी .
रोग प्रतिकारक जातीची लागवड करावी .
२ ) अरगट : प्रसार बियाण्याद्वारे व हवेद्वारे होतो . फुलोरा अवस्थेत कणसातील फुलातून मधासारखा चिकट पदार्थ झिरपतो . तो लालसर , पिवळा व घट्ट असतो . त्याला ‘ मधूबिंदू अवस्था ‘ म्हणतात . त्यामुळे दाणे भरत नाहीत , दाण्याऐवजी लांब काळसर टणक गाठी तयार होतात . त्या विषारी असतात .
बिजोत्पादन क्षेत्रामध्ये फुलोऱ्याच्या अवस्थेत डायथेन एम -४५ या बुरशी नाशकाच्या ०.२ टक्के प्रमाणात दोन फवारण्या कराव्यात . रोगग्रस्त शेतातील बियाणे २० टक्के मिठाच्या पाण्यातून काढूनच पेरणीसाठी वापरावे . शेतामध्ये रोगट कणसे दिसताच काढून जाळावीत .
कापणी व मळणी :
दाण्याचा रंग बदलून कडक , टणक होतो . त्यावर काळसर छटा येते , त्यावेळेस पीक परिपक्व झाले असे समजावे . कापणी झाल्यावर कणसे वाळवावी . मोगरीने , खळ्यावर बैलाच्या सहाय्याने , ट्रॅक्टर फिरवून किंवा मळणीयंत्राने
पिकाची मळणी करावी