बोरडेक्स मिश्रण तयार करण्याची विधी

 बोरडेक्स मिश्रण तयार करण्याची विधी : 

बोरडेक्स मिश्रण तयार करण्याची विधी
 बोरडेक्स मिश्रण तयार करण्याची विधी

मोरचुद , कळीचा चुना प्रत्येकी 1 किलो या प्रमाणात दोन वेगवेगळया प्लॅस्टीक बादल्यामध्ये घ्यावा. 

त्यात प्रत्येकी 5 लिटर पाणी टाकून रात्रभर मुरू दयावे. 

या द्रावणास लाकडाच्या काठीने पुर्णतः विरघळेपर्यत ढवळावे तिसरे मोठया आकाराची प्लॅस्टिक ड्रम घेऊन त्यात मोरचुद व चुन्याचे द्रावण एकत्रित मिसळावे. 

या मिश्रणास जाडसर कापडाने गाळून घ्यावे. 

मिश्रणातील तांब्याचे प्रमाण व सामु तपासण्यासाठी या मिश्रणात लोखंडी खिळा अथवा चाकुचे पाते बुडवावे.

 पात्यावर तांब्याचा लालसर रंगाचा थर आढळल्यास त्यात चुन्याचे थोडेसे द्रावण टाकुन मिश्रण ढवळावे. 

मिश्रणाचा सामु सामान्य ;छमनजतंसद्ध होईस्तोवर त्यात चुन्याचे मिश्रण ओतावे व पुन्हा तपासुन बघावे. 

सामु सामान्य झाल्यास चाकुच्या पात्यावर तांबुस लाल थर येणार नाही. मिश्रणात 90 लिटर पाणी टाकून पूर्ण मात्रा 100 लिटर एवढी करावी. 

असे बोरडेक्स मिश्रण 1ः तिव्रतेचे असून त्याची फवारणी करावी.

बोरडाॅक्स पेस्ट तयार करण्याची विधी

अशाच पद्धतीने बोरडाॅक्स पेस्ट बनविण्यात येते. 

परंतू यात पाण्याची मात्रा 10 लिटर एवढीच ठेवावी. अशा घट््ट द्रावणाचा ब्रशने इजा झालेल्या व छाटलेल्या फांदया अथवा खोडांवर लेप दयावा. 

या सर्व सूचना संत्रा उत्पादकांद्वारे ताबडतोब पालन करण्याकरीता प्रसारित केल्या आहेत.

समृद्धिचा जपा हा मंत्र । मृद व जल संधारणाचे वापरा नव तंत्र ॥

Leave a Comment