माती परीक्षणासाठी नमुना कसा गोळा करावा

  माती परीक्षणासाठी नमुना कसा गोळा करावा 

माती परीक्षणासाठी नमुना कसा गोळा करावा
माती परीक्षण 


माती परीक्षण 

पेरणीपूर्वी जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेऊन पिकांच्या आवश्यकतेनुसार अतिरिक्त अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्याकरिता माती परीक्षण करून त्यानुसार खतांचा वापर करणे अगत्याचे आहे . 

त्याचप्रमाणे कोणत्याही फळझाडाची लागवड करण्यापूर्वी जमिनीची त्या – त्या फळझाडासाठीची योग्यता तपासून पाहणे अत्यंत महत्वाची बाब आहे . म्हणून माती परीक्षण करणे आवश्यक ठरते . 

परीक्षणासाठी नमुने गोळा करणे : 

अ ) मातीचा नमुना – ( रासायनिक खतांच्या शिफारसीसाठी ) 

१. प्रथम शेताची पाहणी करून जमिनीच्या प्रकारानुसार उदा . जमिनीचा रंग , खोली , उतार आणि उत्पादकतेनुसार विभाग करून प्रत्येक विभागातून एक प्रातिनिधिक नमुना परीक्षणासाठी घ्यावा . 

२. नमुना घ्यावयाच्या जागेवरील काडीकचरा बाजूला करून १५ ते २० सें.मी. खोली पर्यंत ‘ व्ही ‘ आकाराचा खड्डा करावा . खड्याच्या पृष्ठभागापासून तळापर्यंतची माती गोळा करावी . अशारितीने आवश्यकतेनुसार ५ ते १० ठिकाणची माती एकत्र करावी व त्यामधून अर्धा किलो प्रातिनिधिक नमुना परीक्षणासाठी घ्यावा . सूक्ष्म अन्नद्रव्यांसाठी नमुना घ्यावयाचा असल्यास खड्डयाच्या १ इंच जाडीच्या कडा लाकडी कामचीने प्रथम खरडून काढावी व जमा झालेली माती काढून टाकावी . पुन्हा १ इंच जाडीचा मातीचा थर लाकडी कामचीने काढून तो परीक्षणासाठी एकत्र करावा . 

३. नमुन्यामधील काडीकचरा , पाने , मुळे काढून माती कागदावर पसरवून सावलीत वाळवावी व नंतर स्वच्छ धुतलेल्या कापडी पिशवीत किंवा प्लॅस्टीकच्या पिशवीत माती भरून आवश्यक माहितीसह प्रयोगशाळेत पाठवावी .

 मातीचा नमुना किती खोलीपर्यंत घ्यावा . 

No. पिक मातीचा नमूना (खोली)
1. ज्वारी , भात , भुईमूग , गहू इत्यादी १५ ते २० से.मी.
2. कपाशी , ऊस , केळी ३० सें.मी
3. फळझाडांच्या बुंध्यापासून १ ते १.५ फूट सोडून बाहेरच्या परिघामधून ३० सें.मी

मातीचा नमुना कसा व कोठे पाठवावा . 

मातीचा नमुना प्रयोगशाळेत पाठविताना प्रत्येक नमुन्यासोबत खालील माहितीचे पत्रक भरून पाठवावे . शेतकऱ्यांचे नाव व पत्ता , शेत सर्वे नं . , मागील हंगामात घेतलेली पिके , पुढील हंगामात घ्यावयाची पिके इत्यादी . 

माती परीक्षण अहवालानुसार निष्कर्ष – 

प्रयोगशाळेत मातीच्या नमुन्याचे आम्ल विम्ल निर्देशांक ( सामू ) , विद्राव्य क्षारांचे प्रमाण ( विद्युत वाहकता ) , सेंद्रीय कर्ब ( नत्राचे प्रमाण समजण्यासाठी ) , उपलब्ध स्फुरद व पालाश या गुणधर्मासाठी पृथःकरण करण्यात येते व त्यानुसार माती परीक्षण अहवाल तयार होतो . या अहवालावरून जमिनीत अन्नद्रव्ये किती प्रमाणात उपलब्ध आहेत याची माहिती मिळते व त्यानुसार पिकांचे प्रकार लक्षात घेऊन सेंद्रीय व रासायनिक खतांच्या मात्रा सुचविण्यात येतात .

सामू ( आम्ल विम्ल निर्देशांक ) 

अनु.क्र. प्रमाण निष्कर्ष   
१. ६.० पेक्षा कमी   आम्ल
२. ६.१ ते ८.५   पिकास मानवणारे  
३. ८.६ ते ९ .० विम्ल होण्याच्या मार्गावर 
४. ९ .१ पेक्षा जास्त   विम्लयुक्त

क्षारता ( विद्युत वाहकता )

 

अनु.
क्र.
प्रमाण निष्कर्ष  
१. १.०० पर्यंत   सर्वसाधारण  
२. १.०१ ते २.००   पर्यत   पीक उगवणीस नुकसानकारक   
३. २.०१ ते ३.००   क्षार संवेदनाक्षम , पिकांच्या वाढीस नुकसानकारक

मुख्य मुलद्रव्यांची जमिनीतील उपलब्धतेनुसार वर्गवारी आणि माती परीक्षणावर आधारित खतांची मात्रा :

अनु.
क्र.
सेंद्रीय कर्व
(%)
उपलब्ध स्फुरद
(की/हे)
उपलब्ध पालाश
(की/हे)
 वर्गवारी  विद्यापीठाने शिफारस केलेल्या
मात्राच्या किती कमी – जास्त
मात्राच्या किती
१. ०.२० पेक्षा कमी   १५ पेक्षा कमी   १२० पेक्षा कमी   अत्यंत कमी    ५० % जास्त
२. ०.२१ ते ०४०  १६ ते ३० १२१ ते १८०  कमी  २५ % जास्त
३. ०.४१ ते ०.६० ३१ ते ५० १८१ ते २४० मध्यम शिफारस केलेली मात्रा
४.  ०.६१ ते ०.८० ५१ ते ६५ २४१ ते ३०० साधारण भरपूर   १० % कमी
५.  ०.८१ ते १.०   ६६ ते ८० ३०१ ते ३६० भरपूर  २५ % 
६. १.० पेक्षा जास्त  ८० पेक्षा जास्त   ३६० पेक्षा जास्त  अत्यंत भरपूर ५० % कमी  ५० % कमी

Leave a Comment