मिरची पिकांवरील किडी व रोगांचे व्यवस्थापन

 मिरची पिकांवरील किडी व रोगांचे व्यवस्थापन 

मिरची पिकांवरील किडी व रोगांचे व्यवस्थापन
मिरची पिकांवरील किडी व रोगांचे व्यवस्थापन 

मिरची किडी

बड बोरर 

अ ) युरिटोमा स्पेसीज 
ब ) सिरंटोन्यूरा इन्डी 
क ) गोईचेला स्पेसीज

लक्षणे:- 

युरिटोमा स्पेसीज या किडीच्या अळ्या मिरचीचे पीक फुलोऱ्यावर असताना , कळीत तसेच लहान व कोवळ्या फळात आढळून येतात . अळ्या फळांचा आतील भाग पूर्णपणे खातात . त्यामुळे फळांची वाढ खुंटते . अळी फळातच कोषावस्थेत जाते . गोईथेला स्पेसीज व सिरेटोन्यूरा इन्डी या किडीच्या अळ्या फुलात तसेच फळात दिसून येतात . अळ्या कळीचा तसेच फुलाचा आतील भाग पूर्णपणे खाऊन टाकतात . त्यामुळे फळे गाठीसारखी दिसतात . कालांतराने गाठी काळ्या पडतात , सडतात व गळून पडतात .

उपाय :- 

१. प्रादुर्भावग्रस्त कळ्या , फुले ताबडतोब गोळा करून नष्ट कराव्यात.

२ या किडीच्या नियंत्रणाकरिता मिथाईल डिमेटॉन २५ टक्के ८ मि.ली. किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के १४ मि.ली. १० लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी .

रोग :-

१. मुळकूज

लक्षणे:- प्रसार रोगट बियाद्वारे , रोपवाटीकेत कोवळी रोपे मलूल होऊन मरतात .

उपाय :- पेरणीपूर्वी बियाण्याला २ ग्रॅम थायरम अथवा ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो या प्रमाणात चोळावे .

२. शेंडेमर / फळसड ( फांद्या वाळणे )

लक्षणे:-
प्रसार हवेद्वारे , झाडाच्या फांद्या शेंड्याकडून वाळत जाऊन पांढऱ्या पडतात . फळावर लहान काळे , खोलगट चट्टे पडतात , फळे नासतात , रोगट पिकली फळे कालांतराने पांढरी पडतात .

उपाय :-

१. रोगट फांद्या जाळाव्यात .

२. रोप लावणीनंतर २५ दिवसांनी ताम्रयुक्त औषध किंवा मॅन्कोझेब या औषधाच्या २५ ग्रॅम किंवा प्रापीनेब १५ ग्र . प्रति १० लि . पाणी याच्या सहा फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात .

३. चुरडा मुरडा

लक्षणे:- प्रसार किटकांद्वारे होतो . पाने बारीक पडतात . पानांचा गुच्छ तयार होऊन रोगट फांदीला झुपक्याचा आकार येतो .

उपाय :- पिकावर विद्यापीठाने दिलेल्या पीक संरक्षण वेळापत्रक प्रमाणे उपाययोजना करावी .

४. भूरी

लक्षणे:- प्रसार हवेद्वारे होतो . पानांवर पांढुरक्या बुरशीची वाढ होते . कालांतराने पाने पिवळी पडून गळून पडतात .

उपाय :- पाण्यात मिसळणारे गंधक ३० ग्रॅम किंवा डिनोकॅप ५ मि.ली. १० लिटर पाण्यात घेऊन फवारावे .

मिरचीचे पीक संरक्षण वेळापत्रक

मिरचीचे रोप तयार करताना प्रथम गादी वाफ्यावर ओळीने बी पेरावे . दोन ओळीमध्ये चर करून त्यात १० टक्के दाणेदार फोरेटे हे किटकनाशक ७० ग्रॅम प्रती चौ . मिटर प्रमाणे टाकावे . बी व किटकनाशक मातीच्या हलक्या थराने झाकावे . या पद्धतीने तयार केलेले रोप सहा पानाचे झाल्यावर त्याची शेतात रोवणी करावी .

रोपवाटिकेत फोरेटचा वापर न केल्यास बियाची उगवण झाल्यानंतर १५ ते ३० दिवसांनी मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही १५ मि.ली. किंवा डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .

मिरचीचे रोप लावणीपूर्वी मोनोक्रोटोफॉस ३६ टक्क , १५ मि.ली. अधिक पाण्यात मिसळणारे गंधक ८० टक्के २५ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २० ग्रॅम , १० लिटर पाण्यात किंवा निंबोळी अर्क ५ % अधिक कॉपर ऑक्सीक्लोराईड ०.३ % ( ३ ग्रॅम / लिटर ) घेऊन त्यात रोपांचा शेंड्याकडील भाग बुडवून नंतरच रोपाची शेतात लागवड करावी .

रोवणीनंतर १० दिवसांनी वरील किटकनाशके आणि २५ ग्रॅम कॉपर ऑक्झीक्लोराईड १० लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी . परत १० दिवसांनी वरील किटकनाशके आणि झायरम ८० टक्के २० ग्रॅम , १० लिटर पाण्यात घेऊन दुसरी फवारणी करावी.अशाप्रकारे मिरचीचे पीक फुलावर येईपर्यंत १०-१५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात.

मिरचीला फुले धरल्यानंतर मॅलाथिऑन ५० टक्के २० मि.ली. किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के १४ मि.ली. अधिक पाण्यात मिसळणारे गंधक ८० टक्के २५ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २० ग्रॅम अधिक १० लिटर पाणी किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के १४ मि.ली. अधिक मॅन्कोझेब २५ ग्रॅम ची पहिली निंबोळी अर्क ५ % अधिक पाण्यात मिसळणारे गंधक ८० टक्के ०.२५ % ( २५ ग्रॅम गंधक + १० लिटर पाणी ) ची दुसरी आणि

मॅलाथिऑन ५० टक्के २० मि.ली. अधिक मॅन्कोझेब २५ ग्रॅम , १० लिटर पाण्यात मिसळून तिसरी याप्रमाणे १५ दिवसाचे अंतराने फवारणी करावी . ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी भूरी रोगाच्या प्रतिबंधासाठी पाण्यात मिसळणाऱ्या गंधकाची फवारणी करावी .

Leave a Comment