मुंग / उडीद उत्पादन तंत्रज्ञान
![]() |
मुंग/ उडीद उत्पादन तंत्रज्ञान |
साधारणतः ६.५ ते ७.५ सामू असलेली जमिन या पिकासाठी योग्य असते .
हवामान : – या पिकास २१ ते ३५ अंश सें.ग्रे . तापमान चांगले मानवते
सुधारीत वाण :
मुग : बीपीएमआर . – १४५.बी एम -२००२-१ , बी एम -२००३-०२ , वैभव 1
उडीद : बी डी यु -१ , टी एयु -१ , टी पी यु -४ , टी एयु -२
पिकाचा कालावधी :
मुग : ६५-७० दिवस
उडीद : ७०-७५ दिवस
बियाणे :
1) मुगः १५ किलो / हेक्टर
2)उडीद : १५ किलो /हेक्टर
बीज प्रक्रिया :
पहिली -२.५ ग्रॅम कार्बेन्डीझम / किलो बियाणे
दुसरी – पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास ५ गोम ट्रायकोडर्मा पावडर लावावी व नंतर ६ मिली रायझोबीएम + ६ मिली पी . एस . बी . जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी .
लागवडीचे अंतर : 130 सेंमी x १० सेंमी
पेरणीची वेळः – मान्सुनचा पहिला पेरणी योग्य पाऊस होताव किंवा जूनल्या दुसन्या पंधरवाड्यात पेरणी पूर्ण करावी .
खत व्यवस्थापन : भरखते -20 बैलगाड्या शेणखत / प्रती हेक्टर
रासायनिक खते : २५:५०:२५ नत्र , स्फुरद व पालाश / हेक्टरी ( एकरी ५० किलो डीएपी -20 किलो एमओपी ) सूक्ष्म अन्नद्रव्ये १५ किलो झिंक सल्फेट / प्रती हेक्टर
तण व्यवस्थापन : पेरणी झाल्यानंतर २४ तासाच्या आत पेंडीमिथेतीन 30-३५ मिली १० ली . पाण्यात घेऊन जमिनीवर फवारावे
आंतरमशागत : पहिली कोळपणी -२० दिवसांनी दुसरी कोळपणी – ३०-३५ दिवसांनी तणांचा प्रादुर्भाव बघून एखादी खुरपणी करावी
पाणी व्यवस्थापन : फुलोरा अवस्था व शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास स्प्रिंकलरने पाणीद्यावे .
मुलस्थानी जलसंधारण : शेवटच्या कोळपणी च्या आधी कोळप्याला जानोळ्याची दोरी / पोते बांधून उथळ सऱ्या पाडाव्यात . पाण्याचा ताण पडल्यास पोटॅशियम नायट्रेट ( १३:००:४५ ) ५० वॉम प्रती १० ली . पाण्यात येऊन पिकावर फवारणी करावी .
पिक संरक्षणः रस शोषण करणाऱ्या किडीव भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी लक्षणे दिसताच डायमिथोएट २० मिली + पाण्यात मिसळणारे गंधक २५ ग्रॅम प्रती १० ली . मिसळून फवारणी करावी दुसरी फवारणी पहिली फवारणी नंतर १०-१५ दिवसांनी डायमिथोएट २० मिली किवा मोनोक्रोटोफॉस २० मिली + १० ग्रॅम कार्बेन्डीझम प्रती १० ली . पाण्यात घेऊन करावी
उत्पादन : मुगः १२-१४ क्विंटल / हेक्टर 1 उडीट : १०-१२ क्विंटल / हेक्टर