राज्यात बाजार समितीमध्ये मोसंबीची आवक सुरू आणि राज्यात हिरवी मिरची १००० ते 3५०० रुपये

बाजार समितीमध्ये मोसंबीची आवक सुरू
बाजार समितीमध्ये मोसंबीची आवक सुरू

बाजार समितीमध्ये मोसंबीची आवक सुरू

मोसंबीच्या आंबिया बहराचा हंगाम सुरू झाला असून, बाजार समितीमध्ये जिल्ह्याच्या विविध भागांतून सुमारे ५० टन आवक होत आहे.टप्प्याटप्‍प्याने परिपक्व गोड मोसंबीची आवक वाढेल दर्जेदार मोसंबीची आवक आंबे बहरात होते. पावसाळ्यात आंबिया बहर सुरू होतो.

 गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंबिया बहरातील मोसंबीची आवक वाढणार असून, हंगामातील पहिल्या टप्प्यात मोसंबीची चव आंबट-गोड राहणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मोसंबीचा गोडवा आणखी वाढेल. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आंबिया बहरातील मोसंबीची प्रतवारी चांगली राहणार आहे, तसेच मोसंबीचे दरही कमी राहतील, 

सध्या किरकोळ बाजारात एक किलो मोसंबीला प्रतवारीनुसार २० ते ४० रुपये दर मिळत आहे. घाऊक बाजारात तीन डझन मोसंबीला (मोठ्या आकाराचे फळ) १०० ते २०० रुपये, तर लहान आकाराच्या चार डझनांच्या मोसंबीला ३० ते ८० रुपये दर मिळत आहे.

राज्यात  हिरवी मिरची १००० ते 3५०० रुपये
राज्यात  हिरवी मिरची १००० ते 3५०० रुपये

राज्यात  हिरवी मिरची १००० ते 3५०० रुपये

राज्यात सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांसह बाहेर राज्यातून मिरचीची आवक होत आहे. शहरातील ठोक बाजारात सध्या चार ते पाच टन आवक होत आहे. या मिरचीला दोन ते अडीच हजार रुपये दर मिळत आहे. तर आठवडे व किरकोळ विक्री बाजारात हिरवी मिरची ४० रुपये प्रतिकिलो प्रमाणे विक्री होत आहे,

पुण्यात प्रतिक्विंटलला २५०० ते ३५०० रुपये,

नगरमध्ये क्विंटलला २००० ते २५०० रुपये, 

अकोल्यात क्विंटलला २००० ते २५०० रुपये,

औरंगाबादमध्ये क्विंटलला १२०० ते २००० रुपये दर, 

परभणीत क्विंटलला २५०० ते ३००० रुपये, 

जळगावात प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर, 

सोलापुरात प्रतिक्विंटलला १००० ते २५०० रुपये हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. 

या आधीच्या सप्ताहातही आवक काहीशी अशीच रोज ८ ते १० क्विंटलपर्यंत होती. तर दर प्रतिक्विंटलला किमान ९०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपये होता. त्या आधीच्या सप्ताहामध्येही दरामध्ये किरकोळ चढ-उतार वगळता दर टिकूनच होते.

Leave a Comment