वनशेतीच्या दृष्टीने वनवृक्षांच्या लागवडीचे तंत्र
शिवन (Miliya Dubiya)
प्रचलित नांव : शिवन
शास्त्रीय नांव : मेलिना अरबोरीया .
हवामान : शुष्क ते दमट , पर्जन्यमान ७५० ते ४५०० मि.मी.
जमिनीची निवड : पाणथळ व रेताड जमीन वगळून इतर जमिनीत वाढ चांगली होते .
रोपाची लागवड : रोपांची लागवड सागाच्या लागवडीप्रमाणेच स्टंप अथवा पॉलिथीन पिशव्यातील रोपे लावून करता येते
रोपातील अंतर : शिवनची लागवड ३*३ मिटर अंतरावर करावी . या पद्धतीने हेक्टरी ११११ झाडे बसतात .
आंतरमशागत : सागाप्रमाणेच शिवनमध्ये आंतरमशागत करावी .
ओलीत : शिवनला ओलीत दिल्यास झाडाची वेगाने वाढ होते . त्याकरिता हिवाळ्यात महिन्यातून दोन वेळा व उन्हाळ्यात चार वेळा सारख्या अंतराने ओलीत द्यावे . ओलीत व चांगली मशागत ठेवल्यास शिवनचे झाड २० वर्षात कापणीयोग्य होते .
कापणी : झाडाची कापणी वयाच्या २० वर्षानंतर करता येईल .
उत्पादन : चांगल्या व्यवस्थापन पद्धतीत २० वर्षानंतर प्रती झाडापासून अंदाजे ६ ते ८ घनफूट लाकूड मिळू शकते .
उपयोग : औद्योगिक वापरात येणारे लाकूड , इमारती लाकूड , जळाऊ लाकूड , फर्निचर , औषधी उपयोग , शेती अवजारे इत्यादी .