शेवंती (फुलझाडांची लागवड)
![]() |
शेवंती |
जाती :
पिकेव्ही शुभ्रा , राजा , पिवळी रेवडी , पांढरी रेवडी , सोनाली , तारा , बग्गी , बिरबल सहानी , आयआयएचआर -४ , इत्यादी .
जमीन :
हलकी ते मध्यम , उत्तम निचरा होणारी .
अभिवृद्धी :
काशा ( सकर्स ) , फाटे कलम यांची मुळे बुरशीनाशकात बुडवून लावावे .
लागवडीचा हंगाम : जून – जुलै .
हेक्टरी बियाणे / झाडे : १,११,१११ काशा .
लागवडीचे अंतर : ३० x ३० सें.मी. सरी वरंबा / वाफ्यात .
रासायनिक खताची मात्रा : १५० : ५० : ५० किलो नत्र , स्फुरद , पालाश , किलो / हेक्टर द्यावे . त्यापैकी अर्धे नत्र , संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीचे वेळी तर शिल्लक अर्धे नत्र एक महिन्याने द्यावे .
फुले येण्याची वेळ : हळव्या जाती : सप्टेंबर – ऑक्टोबर , गरव्या जाती : नोव्हेंबर – डिसेंबर
हेक्टरी उत्पादन : ७ ते १० मे . टन