फळझाडांवरील किडी व त्यांचे व्यवस्थापनसंत्राकाळी / पांढरी माशी :या किडीचा प्रादुर्भाव संत्र्यावर फार मोठ्या प्रमाणात होतो . विदर्भातील हवामानात या किडीच्या तीन पिढ्या पूर्ण होतात . काळी माशी आकाराने लहान ( १ ते १.५ मि.मी. लांब ) असून पंख काळसर आणि पोटाचा भाग लाल रंगाचा असतो . पांढऱ्या माशीचे पंख पांढुरके असतात . या माशा नवतीच्या कोवळ्या पानावर खालच्या बाजूने अंडी घालतात . प्रौढ माशा २-१० दिवस जगतात . कोवळ्या पानावर घातलेली अंडी सूक्ष्म असून सुरुवातीस पिवळसर रंगाची असतात . साधारणतः ४ ते ५ दिवसांनी त्यांचा रंग करडा होतो . अंडी उन्हाळ्यात १५ ते २० दिवसात तर हिवाळ्यात २५-३० दिवसात उबतात . अंड्यातून बाहेर पडलेली पिल्ले सूक्ष्म आकाराची , चापट व पांढुरक्या रंगाची असतात . त्यामुळे ती लक्षात येत नाही . ही पिल्ले पानावर रांगत जाऊन योग्य जागेचा शोध घेतात व नंतर एकाच ठिकाणी राहून पानातील अन्नरस शोषण करतात . काही दिवसांनी ही पिल्ले काळी पडतात . तेव्हा प्रादुर्भाव लक्षात येतो . पिल्लांच्या तीन अवस्था पूर्ण होण्यास ४-६ आठवडे लागतात . पिल्ले नंतर कोषावस्थेत जातात . कोष पूर्ण काळे व टणक असतात . कोषावस्था ६-१० आठवड्यांची असते . त्यांच्या अंगातून साखरेच्या पाकासारखा चिकट द्रव बाहेर पडतो . या स्त्रावावर नंतर काळी बुरशी वाढू लागते . या काळ्या बुरशीलाच ‘ कोळशी ‘ म्हणून संबोधण्यात येते किटकनाशके : ( पिल्लावस्थेवर )मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही ११ मि.ली. संत्र्यांच्या झाडाला वर्षातून तीन वेळा नवती ( मृग : जून – जुलै , हस्त : ऑक्टो.- नोव्हें . आणि आंबिया : जाने . – फेब्रु . ) येते . याच दरम्यान प्रौढ माशा कोषातून बाहेर पडतात व नवतीच्या कोवळ्या पानाच्या मागील बाजूवर अंडी घालतात . टीप : पाने खाणारी अळी :अळ्या संत्र्याची पाने खातात . रोपवाटिकेत प्रादुर्भाव जास्त असतो . या किडीच्या नियंत्रणाकरिता एन्डोसल्फान ३५ टक्के १५ मि.ली. किंवा कार्बारील ५० टक्के पा.मी. भुकटी २० ग्रॅम अधिक १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी . शेताच्या बांधावरील ‘ बावची ‘ या तणाचा नाश करावा . पाने पोखरणारी अळी :अळी संत्र्याची कोवळी पाने पोखरते आणि आतील हरितद्रव्य खाते . त्यामुळे किडग्रस्त पानावर पांढरे चकाकणारे नागमोडी आकाराचे भुयारी मार्ग दिसतात . सायट्रस सिला :जून आणि जानेवारी महिन्यात संत्र्याच्या नवतीवर प्रादुर्भाव जास्त आढळतो . ही कोड कोवळ्या पानातून , कळ्यातून व बारीक नवीन फांद्यातून रस शोषण करते . परिणामी कळ्यांची वाढ न होता त्या गळून पडतात . साल खाणारी अळी :या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जुन्या तसेच दुर्लक्षित संत्र्याच्या बगिच्यात अधिक आढळतो . अळी संत्र्याच्या फांदीच्या बेचकीमध्ये छिद्र करून आत शिरते आणि आतील भाग खाते . किडग्रस्त फांदीवर किंवा खोडावर अळीच्या विष्टेची आणि सालीच्या भुग्याची तयार झालेली जाळी आढळून येते . प्रादुर्भाव अधिक झाल्यास किडग्रस्त फांद्या वाळतात . या किडीच्या प्रादुर्भावाचा उत्पन्नावर तसेच झाडाच्या आयुष्यावर अनिष्ट परिणाम होतो . नियंत्रण :किडग्रस्त फांद्यावरील अळीच्या विष्टेची जाळी काढून साल पोखरणाऱ्या अळीचे छिद्र मोकळे करावे . नंतर त्यामध्ये मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के १४ मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण किंवा पेट्रोल अथवा केरोसीन पिचकारी अथवा ऑईल कॅनच्या सहाय्याने छिद्रामध्ये टाकून छिद्र ओल्या मातीने बंद करावे . ही उपाय योजना वर्षातून २-३ वेळा करावी . फळातील रस शोषण करणारा पतंगसंत्र्याची फळे पक्व होण्याच्या वेळी या किडीचे पतंग रात्री फळाला छिद्र पाडून आतील रस शोषण करतात . या छिद्रातून रोगजंतूचा शिरकाव होऊन छिद्राभोवती फळे सडण्यास सुरुवात होते . परणिामी किडग्रस्त फळे गळून पडतात . मृगबहाराच्या तुलनेत आंबिया बहाराच्या फळांवर म्हणजेच सप्टेंबर – ऑक्टोबर या कालावधीत या किडीचा जास्त प्रादुर्भाव असतो . नियंत्रण :या किडीचा उपद्रव कमी करण्यासाठी संत्र्याच्या झाडाखालील गळालेली फळे जमा करून नष्ट करावीत . संत्रा बागेच्या भोवती असलेल्या गुळवेल , वासनवेल , चांदवेल इत्याची तणांचा नाश करावा . एक लिटर पाण्यात १०० ग्रॅम गूळ व १० मि.ली. मॅलाथिऑन मिसळून तयार केलेले विषारी आमिष मोठे तोंड असलेल्या डब्यात घेऊन ते डबे अधून मधून झाडावर टांगावेत , प्रकाश सापळ्यांचा वापर करावा . सायंकाळी बागेत धूर : करावा . |