” संत्रा बागाईतदार ” जुलै महिन्यात करायची कामे

Table of Contents

 ” संत्रा बागाईतदार ” जुलै महिन्यात करायची कामे!!!

" संत्रा बागाईतदार " जुलै महिन्यात करायची कामे
” संत्रा बागाईतदार ” जुलै महिन्यात करायची कामे

• आधीच्या महिन्यात खड्डे खोदून भरलेल्या खड्डयात संत्रा कलमांची लागवड करावी. कलमा लावतांना कलमांचा डोळा जमीनी पासून 20-25 सेमी उंचीवर असावा. कलमा लावण्यापूर्वी कलमांच्या मुळांना मेफेनोक्झाॅम र्ड 68 (2.5 ग्रॅ) आणि कार्बनडाझिम(1 ग्रॅ) 1 लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात 10-15 मिनीटे बुडवून लावाव्या.

झाडाच्या बुध्याजवळ पाणी साचू देउ नये. जास्तीच्या पावसाच्या पाण्याचा चरा मधून निचरा करावा.

• कलमांवर डोळयाखालील भागातून निघालेल्या नवतीस काढावे. उडीद, मूग, सोयबीन, भूईमुग इत्यादी आंतरपीके घेउ षकता. हिरवळींच्या खतांकरीता ढेंचा किंवा बोरूचे बी 40 किलो प्रति हेक्टर प्रमाणे पेरावे.

• अंबिया बहाराची फळगळ कमी करण्याकरीता 1.5 ग्रॅ 2-4-डी किंवा जीब्रेलीक आम्ल  100 ग्रॅ कार्बनडायझीम  1 किलो युरीया 100 लिटर पाण्यात द्रावण करून फवारणी करावी 15 दिवसांनी पुन्हा फवारणी करावी.

• अंबिया बहाराची फळे असल्यास म्यूरेट आॅफ पोटॅष 180 ग्रॅ प्रति झाड द्यावे. खते झाडांच्या 3 फूट लांबून भोवताल दयावी. दिलेली खते झाडाच्या मातीत व्यवस्थित मिसळलेली असावीत.

• खैऱ्या रोगग्रस्त फांद्या अन् पाने छाटुन चांगल्या प्रकारे मिसळावीत. जाळून टाकावीत. 180 ग्रॅ काॅपर आॅक्सीक्लोराईड आणि स्ट्रेप्टोसायक्लीन 6 गॅ्र, 60 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसरी फवारणी 30 दिवसानंतर करावी.

• सील्ला अन् पाने पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी 12.5 मिली क्वीनॉंलफॉंस किंवा इमिडाक्लोप्रिड 5 मिली. किंवा डायमिथोएट 15 मिली, 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवष्यकता असल्यास दूसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी.

Leave a Comment