सिमारुबा ग्लाऊका – वनशेतीच्या दृष्टीने वनवृक्षांच्या लागवडीचे तंत्र

 वनशेतीच्या दृष्टीने वनवृक्षांच्या लागवडीचे तंत्र

सिमारुबा ग्लाऊका  - वनशेतीच्या दृष्टीने वनवृक्षांच्या लागवडीचे तंत्र
सिमारुबा ग्लाऊका  – वनशेतीच्या दृष्टीने वनवृक्षांच्या लागवडीचे तंत्र

सिमारुबा ग्लाऊका 

प्रचलित नाव : सिमारुबा 

शाखीय नाव : सिमारुवा ग्लाऊका 

हवामान : उष्णकटिबंधीय , सूर्यप्रकाशाची गरज . 

जमिनीची निवड : हलक्या ते भारी जमिनीत लागवड करता येते . समुद्र किनाऱ्याजवळ याची चांगली वाढ होते .

 रोपाची लागवड : मे महिन्याचे शेवटी बी २४ तास पाण्यात भिजवून पॉलिथीन पिशव्यामध्ये २ बिया टाकाव्या . उगवण १५ दिवसात होऊन ४५ दिवस पर्यन्त उगवण होऊ शकते . रोपटे जुलै महिन्यात म्हणजे ८-१० आठवड्यानंतर लागवडीस योग्य होतात . सिमारुबा मध्ये नर व मादी वृक्ष वेगळे असल्यामुळे कलम पद्धतीने मादी वृक्ष व नर वृक्ष तयार करता येतात . रोपांची लागवड करण्यासाठी ४५ सें . मी . x ४५ सें.मी. x ४५ सें.मी. आकाराचे खड्डे तयार करून कुजलेले शेणखत व मातीने पावसाळ्यापूर्वी भरून ठेवावे व पाऊस झाल्यावर रोपांची लागवड करावी . 

रोपातील अंतर : हलक्या जमिनीत ५*५ मीटर , भारी जमिनीत ६*६ मीटर 

आंतर मशागत : रोपावस्थेमध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी . झाडाच्या बुंध्याभोवताली माती भुसभुशीत करावी . 

ओलीत : लागवडीनंतर कमीतकमी ३ वर्षे पर्यंत पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी नंतर वृक्ष फार मोठे होत असल्यामुळे ओलिताची गरज नाही . 

कापणी : सिमारुबास ४-५ वर्षानंतर फळे येतात . फळधारणा झालेल्या वृक्षाखालची जागा एप्रिल महिन्यापूर्वी स्वच्छ ठेवल्यास झालेली फळे जमिनीवरून जमा करता येतात . 

उत्पादन : पूर्ण वाढ झालेल्या वृक्षापासून साधारणतः २ ते ५ किलो प्रतिवृक्ष प्रमाणे फळे मिळतात . फळाचा गर वेगळा करून बी वाळवावे . उपयोग : फळांपासून मिळालेल्या बिया फोडून टरफल वेगळे करून ऑईलमीलमध्ये बियाच्या गरापासून नेहमीच्या पद्धतीने तेल वेगळे करता येते . या वृक्षाच्या बियामध्ये पुष्कळ तेल असते . तेल रिफाईन करून खाद्य तेल म्हणून वापरता येते .

Leave a Comment