सोयाबीन पीक संरक्षण आणि व्यवस्थापन

सोयाबीन पीक संरक्षण आणि व्यवस्थापन 

सोयाबीन पीक संरक्षण
सोयाबीन पीक संरक्षण

सोयाबीन पीक संरक्षण

किडी

अ ) खोड पोखरणाऱ्या किडी :

१ ) खोड माशी : पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही १० मि.ली. किंवा क्लोरपायरीफॉस २० टक्के प्रवाही २० मि.ली. किंवा अँसिफेट ७५ टक्के पा.मि. भुकटी १० ग्रॅम , १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . ज्या भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात खोडमाशीचा प्रादुर्भाव होत असेल त्या ठिकाणी पेरणीचे वेळी फोरेट १० टक्के दाणेदार १० किलो / हे . प्रमाणे वापर करावा .

२ ) चक्रभुंगा :
या किडीचे व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मि.ली. किंवा एन्डोसल्फॉन ३५ टक्के प्रवाही १५ मि.ली. किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के अवाही १४ मि.ली. किंवा फेनव्हॅलेरेट २० टक्के प्रवाही ५ मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून कीड दिसू लागताच फवारणी करावी .

ब ) पाने खाणाऱ्या अळ्या : या पिकावर हिरवी उंट अळी , तंबाखुची पाने खाणारी अळी , केसाळ अळी , घाटे अळी , पाने पोखरणारी अळी ह्यांचा प्रादुभाव दिसून येतो .

सोयाबीनवरील किडींचे एकीकृत व्यवस्थापन

सोयाबीन पिकावर प्रामुख्याने खोडमाशी , चक्रभुंगा , पाने गुंडाळणारी अळी आणि पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव आढळतो . रासायनिक किटकनाशकाचे दुष्परिमाण तसेच त्यांचा वापर कमी करण्याचे दृष्टीने किडींचे गरजेनुसार नियंत्रण करणे आवश्यक आहे . त्यासाठी किडीचे एकीकृत व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे क्रमप्राप्त आहे .

1)सोयाबीनची लागवड करण्यापूर्वी शेताची उन्हाळ्यात नांगरणी करावी . त्यामुळे किडींच्या अवस्थांचा पक्षांद्वारे , उष्णतेमुळे तसेच जमिनीत खोल गाडल्या जाऊन नाश होतो .

2) सोयाबीनची पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपवावी .

3) पेरणीसाठी किडीस प्रतिकारक्षम असणाऱ्या वाणांची ( उदा . पिके -४७२ , टिएएमएस ३८ , टिएएमएस – ९८-२१ , एमएसीएस -१३ ) निवड करावी . ज्या भागात खोडमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो , तेथे पिके – ४७२ वाणाची पेरणी करावी .

4) सोयाबीन पिकास शिफारशीप्रमाणे रासायनिक खताची मात्रा द्यावी . नत्रयुक्त खताचा वापर जास्त झाल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो . ( उदा . चक्रभंगा , पाने खाणाऱ्या अळ्या इ . )

5) पिकाचे सुरुवातीचे अवस्थेत शेत तणमुक्त ठेवावे . तद्वतच बांधावर असणाऱ्या किडीच्या पुरक वनस्पतींचा नाश करावा .

6) केसाळ अळ्या आणि तंबाखुची पाने खाणाऱ्या अळ्यांचा जाळीदार पानांसह नायनाट करावा

7) चक्रभुंग्याचे प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने , फांद्या वाळतात . म्हणून किडग्रस्तझाडे , वाळलेल्या फांद्या , पानाचे देठाचा अळीसह नायनाट करावा . खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाचे रोपावस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड मरते . अशी किडग्रस्त झाडे गोळा करून अळीसह नष्ट करावीत .

8)सोयाबीन पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे आणि किडींनी आर्थिक नुकसानीची मर्यादा पातळी गाठताच कीड नियंत्रणाचे उपाय योजावेत .

9)पाने खाणाऱ्या किंडीचे व्यवस्थापनाकरिता ५ टक्के निंबोळी अर्काचा वापर करावा .

10)सोयाबीन पिकानंतर भुईमूगाचे पीक घेऊ नये .

प्रमुख किडींची आर्थिक नुकसानीची मर्यादा पातळी

अ) तंबाखुची पाने खाणारी अळी / केसाळ अळी
– १० अळ्या प्रती मिटर ओळीत पीक फुलावर येण्यापूर्वी . ९ ) – क )

ब ) हिरवी उंट अळी
४ अळ्या प्रती मिटर ओळीत पीक फुलावर असतांना , ३ अळ्या प्रती मिटर ओळीत शेंगा धरण्याचे अवस्थेत असतांना .

क )घाटे अळी ५ अळ्या प्रती मिटर ओळीत शेंगा धरण्याचे अवस्थेत असतांना .

रोग व त्यांचे व्यवस्थापन

१ ) पानावरील जीवाणू ठिपके :


लक्षणे व परिणाम :
झाडाच्या पानांवर व शेंगावर त्रिकोणी , चौकोनी आकाराचे तपकिरी करड्या रंगाचे ठिपके दिसून येतात . ठिपक्या भोवती पिवळसर वलय दिसते . ठिपक्याचे प्रमाण जास्त असल्यास पाने गळून पडतात .

प्रसार : आर्द्र हवामानात रोग झपाट्याने वाढतो . प्राथमिक प्रसार बियाण्याद्वारे व पिकाच्या रोगट अवशेषातून आणि दुय्यम प्रसार पावसाच्या पाण्याच्या तुषारापासून होतो .

नियंत्रणाचे उपाय :

१ ) पिकाचे रोगट अवशेष गोळा करून जाळावेत .

२ ) पिकावर ३० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड अधिक १ ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लीन १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे . आवश्यकतेनुसार १५ दिवसांचे अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात .

२ ) पानावरील बुरशीजन्य ठिपके – 

लक्षणे व परिणाम : झाडाच्या पानावर , खोडावर व शेंगावर तपकिरी रंगाचे , विशिष्टआकाराचे गडद वलय असलेले ठिपके आढळतात . कालांतराने पानावरील ठिपक्याचे आतील भाग गळून पानाला छिद्रे पडतात

प्रसार : आर्द्र हवामान रोग प्रसारास अनुकूल आहे . रोग प्रसार बियाण्यातून तसेच पिकाच्या रोगट अवशेषातून होतो .

नियंत्रणाचे उपाय :

१ ) पिकाच्या रोगट अवशेषाचा नायनाट करावा .

२ ) पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास २ ग्रॅम थायरम + १ ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा ३ ग्रॅम थायरम लावावे .

३ ) रोग दिसून येताच पिकावर कार्बेन्डाझिम १० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड , २५ ग्रॅम अथवा डायथेन एम -४५ , २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे .

३ ) तांबेरा :

लक्षणे व परिणाम : रोगाची लागण झाल्यास पानाच्या मागील भागावर तांबडे किंवा फिक्कट काळपट , लोखंडी गंजाच्या रंगाचे , सुईच्या टोकाच्या आकाराचे डाग पडतात . रोगाचा जास्त प्रकोप झाल्यास पाने गळून पडतात . शेंगा पोचट व दाणे चपटे राहतात आणि उत्पादनात लक्षणीय घट येते .

प्रसार : साधारणतः २० ते ३० अंश सेल्सीअस तापमान व ८० ते ९ ० टक्के सापेक्ष आर्द्रता असल्यास रोगकारक बुरशीच्या बिजाणूचे अंकूरण होऊन रोगाचा प्रादुर्भाव होतो . साधारणतः ऑगष्ट महिन्यात विदर्भात ही परिस्थिती निर्माण होऊ शकते .

नियंत्रणाचे उपाय :

अ ) रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून .

१ ) रबी व उन्हाळी सोयाबीनची लागवड करू नये

२ ) शेतातील सोयाबीनची स्वअंकूरीत रोपे उपटून टाकावीत .

३ ) शेतातील रोगग्रस्त पिकांचे अवशेष जाळून टाकावे .

४ ) रोगग्रस्त शेतातील बियाणे पेरणीसाठी वापरू नये .

५ ) पेरणीनंतर ३५ दिवसांनी पिकावर डायथेन एम -४५ , २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे .

ब) प्रभावी नियंत्रणाकरिता रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यावर १५ दिवसाचे अंतराने डायफेनकोनॅझोल ( स्कोर ) ०.१ टक्के ( १० मि.ली. ) किंवा प्रापीओकोनॅझोल ( टिल्ट ) ०.०५ टक्के ( ५ मि.ली. ) १० लिटर पाण्यात मिसळून तीन फवारण्या कराव्यात .

४ ) शेंगावरील करपा :

लक्षणे व परिणाम : पाने , खोड आणि शेंगावर अनियमित आकाराचे भुरकट ठिपके पडतात आणि त्यावर नंतर काळी सूक्ष्म बुरशी फळे दिसून येतात . बी तयार होण्याच्या प्रक्रियेत विपरित परिणाम होतो . पाने , खोड व शेंगामध्ये बुरशी सुप्तावस्थेत राहते .

प्रसार : बियाणे तसेच झाडाच्या रोगट अवशेषापासून होतो . आर्द्र व उबदार हवामान या रोगाचे वाढीला पोषक आहे .

नियंत्रणाचे उपाय :

१ ) पिकाच्या रोगट अवशेषाचा नाश करावा .

२ ) ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात थायरम ह्या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी .

३ ) २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड किंवा २५ ग्रम मेन्कोझेब ( डायथेन एम -४५ ) , १० लिटर पाण्यात मिसळून आवश्यकतेनुसार १० ते १५ दिवसाचे अंतराने २ ते ३ वेळा फवारावे .

५ ) मूळ आणि खोडसड :

लक्षणे व परिणाम : रोपावस्थेत रोगाची लागण जास्त दिसून येते . रोगाची लागण जमिनीलगतच्या खोडावर तसेच मुळावर भुरकट काळपट डागांनी होते . खोडाची आणि मुळाची साल रोगग्रस्त झाल्यामुळे रोपांना अन्न पुरवठा होत नाही . त्यामुळे पाने पिवळी पडून गळतात . अशी रोपे मरतात आणि जमिनीलगतच कोलमडतात . रोगट खोडावर आणि मुळांवर असंख्य काळी बुरशी बीजे ( स्क्लेरोशिया ) दिसून येतात .

प्रसार : रोगकारक बुरशी जमिनीत अनेक वर्ष वास्तव्य करणारी आहे . तसेच बियाण्याला लागण होत असल्यामुळे प्रसार बियाण्याद्वारे देखील होतो . जमिनीत कमी ओलावा आणि जमिनीचे तापमान ३० ते ३५ अंश सेल्सीअस रोगाच्या प्रसाराला पोषक आहे .

नियंत्रणाचे उपाय :

१ ) पेरणीपूर्वी १ किलो बियाण्याला ३ ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन किंवा २ ग्रॅम थायरम अधिक १ ग्रॅम कार्बेन्डाझिम लावावे .

२ ) ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी .

३ ) जमिनीत निंबोळी ढेप किंवा तत्सम सेंद्रीय खते घालावी .

६ ) कॉलर रॉट :

लक्षणे व परिणाम : झाडाचे मूळ व खोड यांच्या जोडाजवळ बुरशीची पांढरी वाढ झालेली आढळते . तसेच बुरशी बीजे ही आढळून येतात . पुढे झाडाच्या या भागाची सड होऊन झाड सुकते . परंतु मोठ्या अवस्थेत झाड पिवळे पड़न नंतर मरते .

प्रसार :
रोगकारक बरशी जमिनीत राहते आणि रोगग्रस्त पिकाच्या अवशेषाच्या आणि तणाच्या आश्रयाने जिवंत राहुन पढील रोगाभवास कारणीभत होते . वारा , पाणी आणि आंतर मशागतीच्या साधनाने रोगाचा प्रसार होतो .

नियंत्रणाचे उपाय :

१ ) दिर्घकालपर्यंत पिकाचा फेरपालट करावा .

२ ) खोल नांगरणी करावी.

३ ) पेरणीपूर्वी ३ ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन किंवा २ ग्रॅम थायरम + १ ग्रॅम कार्बेन्डाझिय प्रति किलो बियाणे प्रमाणे वीज प्रक्रिया करावी .

४ ) लागण झालेली झाडे उपटून काडावी व शेताबाहेर नेऊन जाळावीत .

७ ) मोझंक :

लक्षणे व परिणाम : रोगग्रस्त झाडांची वाढ खुंटलेली दिसते . पाने आखूड , लहान जाडसर व सुरकुतलेली होतात . अशा झाडांना शेगा कमी लागतात व त्याही खुरटलेल्याच सापडतात .

प्रसार :
रोगप्रसार मावा या किडीद्वारे व बियाण्यापासून होतो ,

नियंत्रणाचे उपाय :

१ ) विषाणूमुक्त निरोगी पिकालीन बियाणे वापरावे .

२ ) शेतात अगदी सुरुवातीलाच रोगट झाडे दिसताच त्यांचा जाळून नायनाट करावा .

३ ) आंतरप्रवाही किटकनाशके वापरून मावा किडीचे नियंत्रण करावे .

८ ) पिवळा मोडॉक :

लक्षणे व परिणाम : रोगट झाडाच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो . शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात .

प्रसार : पांढऱ्या माशीद्वारे रोगप्रसार होतो .

नियंत्रणाचे उपाय :

१ ) विषाणूमुक्त निरोगी पिकातील बियाणे वापरावे .

२ ) शेतात अगदी सुरुवातीलाच रोगग्रस्त झाडे दिसताच त्यांचा जाळून नायनाट करावा .

३ ) आंतरप्रवाही किटकनाशके वापरून पांढऱ्या माशीचे नियंत्रण करावे .

सोयाबीनवरील रोगांचे एकीकृत व्यवस्थापन

सोयाबीन पिकावर प्रामुख्याने रोपमर , मुळकूज , खोडकूज , शेंगावरील करपा , तसेच त्याचा वापर कमी करण्याचे दृष्टीने रोगाचे गरजेनुसार नियंत्रण करणे आवश्यक आहे . सूक्ष्म जीवाणूचा करपा इत्यादीचा प्रादुर्भाव आढळतो . रासायनिक बुरशीनाशकाचा दुष्परिणाम त्यासाठी रोगाचे एकीकृत व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे फायद्याचे ठरते ..

१ ) सोयाबीनची लागवड करण्यापूर्वी शेतात उन्हाळी नांगरणी करावी . त्यामुळे बुरशीची बीजे , जंतू तसेच बुरशीचे फळे इत्यादीचा उष्णतेमुळे तसेच जमिनीत खोल गाडल्या जाऊन नाश होतो .

२ ) सोयाबीनची पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपवावी ,

३ ) पेरणीसाठी विविध बुरशी तसेच सूक्ष्म जीवाणूस प्रतिबंधक / प्रतिकारक असणाऱ्या वाणाची निवड करावी .

४ ) पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची किंवा जैविक बुरशी जसे – ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करावी .

५ ) सोयाबीन पिकास शिफारशीप्रमाणे रासायनिक खताची मात्रा द्यावी . नत्राचा वापर जास्त झाल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढतो .

६ ) पिकाचे सुरुवातीचे अवस्थेत शेत तणमुक्त ठेवावे . बांधावर असणाऱ्या पुरक वनस्पतीचा नाश करावा .

७ ) प्रथमावस्थेत अत्यल्प प्रमाणात असलेली मरग्रस्त / रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत .

८ ) सोयाबीन पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे व आवश्यकतेनुसार रोगाची तीव्रता व पिकाची अवस्था पाहून बुरशानाशकाची फवारणी करून रोगाचे व्यवस्थान करावे .

सोयाबीन उत्पादनवाढीच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या सूचना :

१ ) धूळ पेरणी करू नये .

२ ) पेरणीपूर्वी बियाण्यास जीवाणू संवर्धन लावावे .

३ ) बियाणे ४ सें.मी. पेक्षा जास्त खोल पेरु नये .

४ ) उताराला आडवी पेरणी करावी .

५ ) रोपांची संख्या प्रति हेक्टरी ४ ते ४.५ लाख ठेवावी .

६ ) पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणशक्ती तपासून घ्यावी तसेच बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी .

७ ) रोगग्रस्त शेतातील बियाणे वापरु नये .Leave a Comment