![]() |
Benefits of using organic fungicide and organic fertilizers |
Table of Contents
Benefits of using organic fungicide and organic fertilizers
स्फुरद विरघळविणारे organic fertilizersजीवाणू खते ( संवर्धन ) :
जमिनीमध्ये निसर्गतः वेगवेगळ्या प्रकारचेorganic fertilizers जीवाणू , बुरशी , शेवाळ व अँक्टीनोमायसेटस असतात . त्यापैकी काही जमिनीत अद्राव्य स्वरुपात स्थिर झालेले स्फुरद विरघळवून ते पिकास उपलब्ध करून देतात . याशिवाय पिकासाठी उपयुक्त असलेले वाढवर्धक द्रव्ये तयार करण्याचे कार्यही हे सूक्ष्मजीव करतात . त्यापैकी जे जमिनीतील अद्राव्य स्फुरदाचे विघटन करतात ते खाली दिले आहेत .
अ ) अणूजीव – बॅसिलस मेगॅथेरीयम व्हार फॉस्फेटीकम , बॅसिलस पॉलीमिक्झा , सुडोमोना फ्लोरोसन्स , सु . स्ट्रायटा , सु . कलिसीस , अक्रोमोबॅक्टर इत्यादी .
ब ) बुरशी – अॅस्परजीलस अवामोरी , अॅ . नायजर , ॲ . फलेव्हस , पेनिसिलीयम लिलिऑसिनम , ग्लॉडोस्पोरीअम इत्यादी .
क ) अॅक्टीनोमायसेटम – स्ट्रेप्टोमायसीस , अॅक्टीनोमायसेटस
ड ) व्हीए – मायकोरायझा , ग्लोमस , गिगॅस्पोरा , अक्युलोस्पोरा इत्यादी .
स्फुरद विरघळणारे जीवाणू खत
प्रयोगशाळेत कृत्रिम रितीने स्फुरद विरघळविणारे जीवाणूची वाढ करून , योग्य माध्यमात मिसळून तयार होणाऱ्या खताला स्फुरद जीवाणू खत म्हणतात . माध्यम म्हणून पीटमाती , लिग्नाईट पावडर , कोळशाची भुकटी किंवा शेणखत यांचा वापर करतात .
स्फुरद विरघळविणारे जीवाणू खत वापरण्याची पद्धती स्फुरद विरघळविणाऱ्या organic fertilizersजीवाणू खताचा बियाण्यावर , रोपाच्या मुळावर अंतरक्षीकण पद्धतीने वापर करतात किंवा शेणखत मिसळून जमिनीत पेरतात . नत्र स्थिर करणारे जीवाणू खत व स्फुरद विरघळविणारे जीवाणू खत एकत्र मिसळून बियाण्यावर किंवा रोपाच्या मुळावर अंतरक्षीकण पद्धतीने लावता येतात . त्याचप्रमाणे शेणखतात एकत्र मिसळून जमिनीत पेरता येतात . –
६ ) Trichoderma – organic fungicideरोगनियंत्रक बुरशी :
अलीकडे रासायनिक बुरशीनाशकाला पर्याय म्हणून ट्रायकोडर्मा नावाच्या बुरशीचा उपयोग पिकावरील रोग नियंत्रणासाठी होऊ लागला आहे . पिकावरील मर , मुळकूज , अशा जमिनीत वास्तव्यास असणाऱ्या रोगकारक बुरशी ( उदा . फ्युजरीअम , रायझोक्टोनिया , स्क्लेरोशियम , पिथीअम ) मुळे उद्भवणाऱ्या रोगाचे नियंत्रण ट्रायकोडर्मा बुरशीमुळे करता येते . ट्रायकोडर्माच्या दोन प्रजाती वापरात आहेत . एक ट्रायकोडर्मा हरजीएनम व दुसरी ट्रायकोडर्मा व्हिरीडी , यांचे संवर्धन २५० ग्रॅम आणि एक किलो पाकिटाच्या स्वरुपात बाजारात मिळते .
organic fungicide Trichodermaची कार्यपद्धती :
सर्वप्रथम Trichoderma ही बुरशी हानिकारक बुरशीच्या धाग्यामध्ये विळखा घालून आपले साम्राज्य पसरविते व त्यातील पोषक द्रव्ये शोषून फस्त करते . परिणामी अपायकारक बुरशीचा बंदोबस्त होतो . या बुरशीची वाढ जलद गतीने होते . त्यामुळे अन्नद्रव्य शोषणासाठी ही बुरशी स्पर्धा करते . अपायकारक बुरशीच्या वाढीसाठी लागणारे कर्ब , नत्र , व्हिटॅमिन इत्यादीची कमतरता होऊन हानिकारक बुरशीची वाढ खुंटते . तसेचorganic fungicide ट्रायकोडर्मा बुरशी ग्लायोटॉक्झीन व व्हिरीडीन नावाची प्रती जैविके निर्माण करते . ही प्रती जैविके रोगजन्य बुरशीच्या वाढीला मारक ठरतात . तसेच या बुरशीचे कवकतंतू रोपाच्या मुळावर पातळ थरात वाढतात व त्यामुळे रोगकारक बुरशीचे कवक तंतू मुळामध्ये प्रवेश करू शकत नाही .
ट्रायकोडर्मा वापरण्याची पद्धत :
१ ) बीज प्रक्रिया – ट्रायकोडर्मा ही बुरशीorganic fungicide वापरण्याची सर्वसाधारण व उपयुक्त अशी पद्धत म्हणजे बीज प्रक्रिया , पेरणीचे वेळी ४ ग्रॅम या प्रमाणात १ किलो बियाण्यास ट्रायकोडर्मा पावडरची बीज प्रक्रिया करावी . सर्व बियाण्यावर सारखा थर होईल याची काळजी घ्यावी . बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणी करावी .
२ ) माती प्रक्रिया – जमिनीमार्फत होणाऱ्या रोगजन्य बुरशीच्या नियंत्रणासाठी १ ते २.५ किलो Trichoderma भुकटी २५ ते ३० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिश्रण करून एक हेक्टर क्षेत्रात पसरवून मातीत मिसळावे व शक्य असल्यास पाणी द्यावे .
३ ) द्रावणात रोपे बुडविणे- गादी वाफ्यावर रोपे तयार झाल्यानंतर लागवडीपूर्वी ट्रायकोडर्मा या बुरशीचे ५०० ग्रॅम , ५ लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे व त्यात रोपाची मुळे ५ मिनीटे बुडवून नंतर त्यांची लागवड करावी .
ट्रायकोडर्मा बुरशीचे फायदे :
१ ) नैसर्गिक घटक असल्यामुळे या बुरशीचा पर्यावरणावर कोणताच परिणाम होत नाही .
२ ) प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याची शक्यता कमी .
३ ) जमिनीत सेंद्रीय पदार्थ कुजवून देण्यास तसेच जमीन सुधारण्यात मदत होते .
४ ) बीज प्रक्रिया केल्याने उगवण शक्ती वाढवून बीज अंकूरण जास्त प्रमाणात होते .
५ ) हानिकारक / रोगकारक बुरशीचा संहार करते .
६ ) पिकाचे संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत संरक्षण करते .
७ ) किफायतशीर असल्याने खर्च कमी होतो .
ट्रायकोडर्मा बुरशीचाorganic fungicide प्रभावी वापर करण्यासाठी आवश्यक बाबी :
१ ) Trichodermaची कार्यक्षमता वाढण्यासाठी जमिनीत सेंद्रीय पदार्थ भरपूर प्रमाणात टाकावेत .
२ ) ट्रायकोडर्मा बुरशीचेorganic fungicide पाकीट / द्रावण थंड जागेत सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावे .
३ ) रासायनिक बुरशीनाशक लावलेल्या बियाण्यासTrichodermaची मात्रा दुप्पट करावी .
४ ) ट्रायकोडर्मा सोबत रायझोबीयम / ॲझोटोबॅक्टर / अँझोस्पिरीलम तसेच स्फुरद विरघळविणारे जीवाणू या जैविक खतांची बीज प्रक्रिया करता येते .
अशाप्रकारेorganic fungicide ट्रायकोडर्मा बुरशीचे महत्व लक्षात घेता या जैविक बुरशीचा एकीकृत रोग व्यवस्थापनेच्या संकल्पनेमध्ये महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे . जैविक नियंत्रणाच्या घटकांचा वापर करणे आवश्यक आहे . त्याद्वारेच निसर्गात उपलब्ध असलेल्या जैविक घटकांचे संरक्षण आणि संवर्धन होऊ शकते .
७ ) बुरशीजन्य किटकनाशके :
सद्य परिस्थितीत मानवाचा कल जैविक नियंत्रणाकडे वळत आहे आणि जैविक नियंत्रणाचा वापर कीड व्यवस्थापनासाठी करणे ही काळाजी गरज आहे . अद्यावत एकीकृत कीड व्यवस्थापनेच्या संकल्पनेमध्ये जैविक नियंत्रणाच्या घटकाचा वापर करणे अत्यंत महत्वाचे आणि आवश्यक आहे . मानवाप्रमाणेच किटकांना पण साथीचे रोग होतात व हे रोग मुख्यतः बुरशी , सूक्ष्म जीवाणू व विषाणू मुळे होतात . अशा उपयुक्त कीड नियंत्रक बुरशीची माहिती याप्रमाणे आहे .
१ ) मेटॉरीझम : या बुरशीला ‘ ग्रीन मस्करडाईन ‘ बुरशी असे म्हणतात , कारण किडीवर हिरवट बुरशीची वाढ होते . ही बुरशी मावा , तुडतुडे , फुलकिडे , पांढरी माशी , बोंडअळी , हुमणी , भातावरील हिरवे तपकिरी तुडतुडे इत्यादीचा नायनाट करते . व्यवस्थापनासाठी मेटॉरीझम अँनीसोपली ही प्रजाती प्रभावीपणे कीड नियंत्रण करते असे आढळून आले आहे .
२ ) बिव्हेरीय : यामध्ये बिव्हेरीय बॅसीयाना ही प्रजाती किटकांना मारक आहे . ह्या बुरशीमुळे ‘ व्हाईट मस्करडाईन ‘ रोग होतो . शेतात तसेच प्रयोगशाळेत या बुरशीची उपयोगिता सिद्ध झाली आहे . ही बुरशी बोंड अळ्या , तंबाखुची पाने खाणारी अळी , पाने गुंडाळणारी अळी , ज्वारीवरील खोड किडा , मावा , भातावरील काटेरी भुंगे इ . प्रभावी नियंत्रण करते .
३ ) नोम्युरिया : या बुरशीमुळे किडींना ‘ ग्रीन मस्करडाईन ‘ रोग होतो . ही बुरशी बऱ्याच प्रमाणात किडीमध्ये साथीचे रोग पसरविते . मुख्यतः पतंगवर्गीय किडी या बुरशीला बळी पडतात . कापसाची बोंडअळी , उंट अळी , तंबाखुची पाने खाणारी अळी , केसाळ अळी इत्यादींचा समूळ नायनाट करते . या बुरशीचा पिकावर फवारणीसाठी उपयोग केला जातो .
४ ) व्हर्टिसिलीयम : व्हर्टिसिलीयम लॅकॅनी ही बुरशी रसशोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी फायदेशीर आहे . रसशोषण करणाऱ्या किडी जसे – मावा , तुडतुडे , पांढरी माशी तसेच काही पाने खाणाऱ्या अळ्याचे पण नियंत्रण करते .
जीवाणूorganic संवर्धने व organic fungicideबुरशीनाशके वापरण्याचे फायदे :
जीवाणू संवर्धने म्हणजेच जीवाणू खते ज्यात नत्र उपलब्ध करून देणाऱ्या व जमिनीतील स्फुरद विरघळविणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंच्या गटाचे मिश्रण असते . यांचे फायदे
१. जीवाणूorganic खते वापरल्यास पीक उत्पादनात २० ते ४० टक्केपर्यंत वाढ आढळून आली आहे .
२. यांच्या वापराने जमिनीची सुपिकता व उत्पादकता वाढते .
३. जीवाणू खते अत्यंत कमी प्रमाणात लागतात . त्यामुळे त्यांच्या वापराचा खर्च अत्यल्प आहे .
४. जीवाणूorganic खतांचा जमिनीवर कोणताही विपरित परिणाम होत नाही .
५. नंतरच्या पिकास त्याचा फायदा होतो .
६ . वापरण्यास अत्यंत सोपे व कमी खर्चाचे
७ . रासायनिक खतांची बचत होते .
अनु.क्र. | जीवाणू संवर्धने ) बुरशी नाशके | पीक | मात्रा प्रती किलो बियाण्यास | संवर्धनाची किंमत प्रती किलो |
---|---|---|---|---|
१. | Azotobacter | कपाशी , ज्वारी , गहू , धान इत्यादी तृण धान्याकरिता | २५ ग्रॅम प्रति किलो | रू . किलो |
२. | Rhizobium | सोयाबीन , तूर , मूग , उडीद, भुईमूंग इत्यादी दाळवर्गीय पिकांस, | २५ ग्रॅम प्रति किलो | रू . किलो |
३. | स्फुरद विरघळविणारे जीवाणू ( पी.एस.बी. ) | सर्व पिकांकरिता | २० ग्रॅम प्रती किलो | रू . किलो |
4. | टायकोडर्मा ( बुरशीनाशक ) | सर्व पिकांकरिता | ५ ग्रॅम प्रती किलो | रू . किलो |