पाच टक्के[5%] निंबोळी अर्क [Neem extract] तयार करण्याची पद्धत

निंबोळी अर्क [Neem extract]
निंबोळी अर्क [Neem extract]


पाच टक्के[5%] निंबोळी अर्कNeem extract तयार करण्याची पद्धत

उन्हाळ्यात ( पावसाळ्याच्या सुरुवातीस )Neem extract निंबोळ्या उपलब्ध असताना जमा कराव्यात . त्या चांगल्या वाळवून साफ कराव्यात आणि साठवून ठेवाव्यात .


फवारणीच्या आदल्या दिवशी आवश्यक तितक्या निंबोळ्या कुटून बारीक कराव्यात .

पाच किलो निंबोळी चुरा neem powder नऊ लिटर पाण्यात ( फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी ) भिजत टाकावा . तसेच एक लिटर पाण्यात २०० ग्रॅम साबणाचा चुरा वेगळा भिजत टाकावा .

दुसऱ्या दिवशी सकाळी निंबोळीचा अर्कNeem extract फडक्यातून चांगला गाळून घ्यावा . या अर्कात एक लिटर पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावे . हा अर्कNeem extract एकूण १० लिटर होईल एवढे पाणी टाकावे .

वर नमूद केल्याप्रमाणे तयार केलेला एक लिटर अर्क ९ लिटर पाण्यात मिसळून ढवळावा व फवारणीसाठी वापरावा . अशाप्रकारे निंबोळी अर्कNeem extract फवारणीच्या दिवशीच तयार करून वापरावा .

राज्यात बाजार समितीमध्ये मोसंबीची आवक सुरू आणि राज्यात हिरवी मिरची १००० ते 3५०० रुपये

बाजार समितीमध्ये मोसंबीची आवक सुरू बाजार समितीमध्ये मोसंबीची आवक सुरू मोसंबीच्या आंबिया बहराचा हंगाम सुरू झाला असून, बाजार …

Read more