Organic fertilizers production technology

 [Organic fertilizers]जीवाणू खते / संवर्धने  उत्पादन तंत्रज्ञान

Organic fertilizers
Organic fertilizers

Organic fertilizers जीवाणू खते म्हणजे काय ? 

जीवाणू खत[Organic fertilizers] संपूर्ण सेंद्रीय व सजीव असून त्यामध्ये कोणताही अपायकारक , टाकाऊ अथवा निरुपयोगी घटक नाही . हवेतील नत्र शोषून व साठवून नंतर पिकांना उपलब्ध करून देणाऱ्या जीवाणूंची प्रयोगशाळेत वाढ करून त्यापासून तयार केलेल्या खतांना [Organic fertilizers]जीवाणू खते म्हणतात .

 १. ॲझोटोबॅक्टर जीवाणू खते : 

या खतातील जीवाणू एकदल व तृणधान्य पिकांना उपयोगी पडते . उदा . गहू , ज्वारी , बाजरी , भात , कपाशी इत्यादी . 

२. रायझोबियमOrganic fertilizers जीवाणू खते : 

हे जीवाणू खत फक्त शेंगवर्गीय / द्विदल पिकासाठी उपयोगी पडते . परंतु निरनिराळ्या पिकांसाठी विशिष्ट प्रकारच्या रायझोबियम गटाचे जीवाणूंचे खत वापरावे लागते . काही महत्वाच्या पिकांचे गट पुढे दिले आहेत . 

१. चवळी गट चवळी , भुईमूग , तूर , मटकी , उडीद , मूग , गवार , ताग , धैंचा , कुलथी इत्यादी ( रायझोबियम स्पेसीज ) 

२.हरभरा गट -हरभरा ( रायझोबियम स्पेसीज ) 

३. वाटाणा गट – वाटाणा , मसूर ( रायझोबियम लेग्युमिनीसोरम ) 

४. घेवडा गट सर्व प्रकारचा घेवडा ( रायझोबियम फॅजीओलाय ) 

५. सोयाबीन गट सोयाबीन ( रायझोबियम जापोनिकम / बॅडी रायझोबियम जापोनिकम ) 

६. अल्फा अल्फा गट मेथी , ल्यूसर्न ( रायझोबियम मेलीलोटी ) 

७. बरसीम गट बरसीम ( रायझोबियम ट्रायफोली ) 

वापरण्याची पद्धत : 

साधारणतः २५० ग्रॅम जीवाणू खतOrganic fertilizers हे दहा ते पंधरा किलो बियाण्याकरिता पुरेसे होते . बियाण्याचा आकार मोठा असल्यास वीस ते तीस किलो बियाण्यास पुरेस होते . एक लिटर गरम पाण्यात १२५ ग्रॅम गूळ मिसळून द्रावण तयार करावे . थंड झालेले पुरेसे द्रावण घेऊन संवर्धन मिसळावे . बियाणे फरशी , ताडपत्री अथवा बारदाना यावर पसरावे व त्यावर हे मिश्रण शिंपडून हलक्या हाताने संपूर्ण बियाण्यास लागेल अशा पद्धतीने चोळावे . नंतर सावलीत वाळवावे . हे बियाणे चोवीस तासाचे आत पेरणीसाठी वापरावे .

जीवाणू संवर्धन लावताना घ्यावयाची काळजी : 

१.जीवाणू संवर्धनाचे पाकिट थंड व कोरड्या जागी , किटकनाशके , बुरशीनाशके व  जंतुनाशके तसेच रासायनिक खतांपासून दूर ठेवावे .  

२.जीवाणू संवर्धनाच्या पाकिटावर जी अंतिम तारीख दिलेली असेल त्या तारखेपर्यंतचOrganic fertilizers जीवाणू खताचा वापर करावा .

३.रायझोबियम जीवाणू लावण्यापूर्वी सर्व कडधान्यांना बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया प्रथम करावी . ( उदा . थायरम तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्यास प्रथम लावावे व नंतर जीवाणू संवर्धन लावून पेरणी करावी . ) 

४.जीवाणू संवर्धन लावण्यापूर्वी जर बियाण्यास किटकनाशके , बुरशीनाशके , जंतुनाशके इत्यादी लावलेली असतील तर जीवाणू संवर्धन नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात ( १०० ग्रॅम ) लावणे चांगले राहील . 

५.कोणत्याही रासायनिक खताबरोबर जीवाणू संवर्धन मिसळू नये . 

६.प्रत्येक पिकाचे जीवाणू संवर्धन वेगवेगळे असते . ज्या पिकाचे जीवाणू संवर्धन असेल ते त्याच पिकास वापरावे . 

७.बीज प्रक्रिया सावलीत करून व पेरणीपूर्वी असे बियाणे सावलीत वाळवून नंतर ताबडतोब पेरणी करावी . 

३ ) निळे हिरवे शेवाळ : 

ही एक सूक्ष्मदर्शी , एकपेशीय , तंतूमय शरीररचना असलेली गोड्या पाण्यातील स्वयंपोषी पाणवनस्पती आहे . निळे – हिरवे शेवाळmoss पाण्यात राहून हवेतील मुक्त स्थितीत असलेला नत्र हेटरोसीस्ट या विशिष्ट प्रकारच्या शरीर रचनेव्दारे जमिनीत स्थिर करते . 

निळ्या – हिरव्या शेवाळाच्या काही निवडक जाती : 

अनाबिना , अलोसिरा , सिलेंड्रोस्परमम , बेस्टीलॉपसिस , ऑसिलॅटोरीया , नोस्टॉक , सायटोनीमा व टॉलीपोथ्रिक्स .

 अ ) निळे – हिरवे शेवाळmoss वाढविण्याची पद्धत : शेतमाल प्रक्रिया ह्या करिता मुख्यत्वेकरून लोखंडी पत्र्याचे ट्रे / सिमेंट काँक्रिटचे हौद / खड्डा पद्धत अवलंब केल्या जाते .

१. निळे – हिरवे शेवाळ जीवाणू खत तयार करण्यासाठी जास्त काळ सूर्यप्रकाश व उष्णता मिळू शकेल अशा जागेवर २ मी . x१ मी . x २३ सें . मी . आकाराचे खड्डे अथवा वाफे तयार करावेत . खड्डयाचा तळ एकसारखा करून पाणी जमिनीमध्ये झिरपून जाऊ नये म्हणून तेवढ्या आकाराचा जाड प्लॅस्टीकचा कागद टाकावा . तसेच खड्डया ऐवजी याच आकाराचे लोखंडी पत्र्याचे ट्रे अथवा सिमेंट क्राँक्रिटचे हौद यांचाही वापर करता येतो . 

२. अशाप्रकारे प्लॅस्टिकचा कागद टाकून तयार केलेल्या खड्यामध्ये , लोखंडी पत्र्याच्या ट्रेमध्ये अथवा सिमेंट क्राँक्रिटच्या हौदामध्ये प्रति २ चौरस मिटरला ८ ते १० किलो शेतातील बारीक पोयटा माती अधिक २०० ग्रॅम सुपरफॉस्फेट अधिक १० ते २० ग्रॅम युरिया यांचे एकजीव मिश्रण समतल पसरावे . तसेच निळे हिरवे शेवाळाच्या चांगल्या वाढीसाठी २ ग्रॅम सोडियम मॉलिब्डेटचाही वापर करावा . 

३. त्यानंतर खड्यामध्ये १० ते १५ सें.मी. उंचीपर्यंत पाणी भरावे व मातीसहीत सर्व मिश्रण चांगले ढवळून घ्यावे . 

४. साधारणपणे ८ ते १० तासांनी खड्डयातील पाणी स्वच्छ होऊन स्थिर होते . सर्व माती तळाशी बसते . यावेळी निळे हिरवे शेवाळाच्या मातृकल्चरची भुकटी ( २५० ग्रॅम ) पाण्याचे पृष्ठभागावर टाकावी . ( पाणी ढवळू नये . ) 

५. डासांचा अथवा इतर किटकांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २५ ग्रॅम कार्बोफ्युरॉन ( ३ टक्के दाणे ) किंवा मॅलाथिऑन अथवा इतर किटकनाशकाचा वापर करावा . 

६. जीवाणू खतOrganic fertilizers तयार करण्यासाठी वापरलेल्या मातीचा सामू निर्देशांक ७.० एवढा असावा . जर सामू निर्देशांक आम्लधर्मीय ( ७ पेक्षा कमी ) असल्यास योग्य सामू निर्देशांक मिळविण्यासाठी आवश्यक तेवढे कॅल्शियम कार्बोनेट ( चूना ) टाकावे . 

७. भरपूर सूर्यप्रकाश व उष्णता असल्यास साधारणपणे १०-१२ दिवसात खड्ड्यामध्ये मातीच्या पृष्ठभागावर तसेच पाण्यावर निळे – हिरवे शेवाळाचीmossभरपूर वाढ झाल्यावर खड्ड्यातील संपूर्ण पाणी आटू द्यावे . खड्डयातील शेवाळाची वाढ व माती सुकू द्यावी . 

८. शेवाळाच्या पापड्या मातीवर तयार होतात . त्या गोळा करून पिशव्यामध्ये भरून ठेवाव्यात . एकावेळी २ चौरस मिटरच्या खड्ड्यातून सुमारे दीड ते दोन किलो निळे हिरवे शेवाळ जीवाणू खत मिळते . 

९ . खक्यामध्ये वर सांगितल्याप्रमाणे पुन्हा पाणी भरून शिल्लक राहिलेली माती व पाणी ढवळून घ्यावे . पुन्हा शेवाळ वाढू द्यावे . यावेळेस खड्ड्यामध्ये मातृकल्चर व सुपर फॉस्फेट टाकण्याची आवश्यकता नसते . अशाप्रकारे एका खड्यात २-३ वेळा निळे – हिरवे शेवाळ जीवाणू खतOrganic fertilizers तयार करता येते . त्यानंतर खक्यातील माती जवळ जवळ संपलेली असते .

नळ्या हिरव्या शेवाळाचे फायदे : 

१. हवेतील मुक्त नत्र स्थिर करून जवळ जवळ २५-३० किलो नत्र दर हेक्टरी एका हंगामात मळू शकतो . त्यामुळे रासायनिक खतामार्फत दिल्या जाणाऱ्या हेक्टरी २५ ते ३० किलो नत्र खताची बचत होते . 

२. जमिनीत अद्राव्य स्वरुपातील स्फुरद भात पिकास काही प्रमाणात उपलब्ध होतो . 

३. जमिनीत सेंद्रीय द्रव्यांची भर पडते . 

४. जमिनीचा पोत सुधारतो . 

५. जमिनीत अॅझोटोबॅक्टर , बायजेरिकीया इ . जीवाणूंची वाढ होण्यास मदत होते . 

निळे – हिरवे शेवाळ वापरताना घ्यावयाच्या काही दक्षता व महत्त्वाच्या सूचना 

१. निळे – हिरवे शेवाळmoss वापरल्याने रासायनिक खतांची उणीव पूर्णपणे भरून काढता येत नाही . म्हणून शेवाळ हे रासायनिक खताना पूरक खत म्हणून वापरावे . 

२. भाताच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी रासायनिक खताची प्रमाणित मात्रा व २० किलो शेवाळ प्रति हेक्टरी वापरणे आवश्यक आहे . 

३. रासायनिक खते , औषधे व शेवाळmoss एकत्र मिसळून वापरू नयेत , ते स्वतंत्र्यरित्या वापरावे . 

४. शेवाळाची मात्रा भाताच्या पुनर्लावणीनंतर ८-१० दिवसांनी पाणी स्वच्छ झाल्यानंतर शेतात फिसकटून द्यावी व त्यानंतर पाणी ढवळू नये . 

५.शेवाळाचे वाढीसाठी भात शेतात पाणी साठवून ठेवणे आवश्यक आहे . 

६. भात शेतात किटकनाशके , बुरशीनाशके आणि तणनाशके यांचा प्रमाणित वापर केल्यास त्याचा शेवाळावर अनिष्ट परिणाम होत नाही . 

७. रासायनिक खते व औषध यांच्या पिशव्यामध्ये निळे- हिरवे शेवाळmoss संवर्धन साठवून ठेवू नये . 

८. कमीत कमी सलग तीन हंगामात शेवाळाचाmoss वापर करावा . 

Leave a Comment