Waste Dcomposer (वेस्ट डि कंपोजर) best no.1 bacterial culture

वेस्ट डि कंपोजर (Waste Dcomposer) हे नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग, गाझियाबाद या संस्थेद्वारे संशोधित शेतीसाठी उपयुक्त बुरशी व जीवाणूंचे कल्चर (संवर्धित स्वरूप) आहे.

Waste Dcomposer
Waste Dcomposer

एका विशिष्ट माध्यमात जतन केलेले हे Waste Dcomposer  जीवाणू प्लास्टिक बाटल्यांमधे ३ वर्षांपर्यंत वापरण्यायोग्य अवस्थेत राहतात. यामधे पिकाच्या वाढीसाठी तसेच विविध अपायकारक बुरशी व विषाणूंपासून सुरक्षा प्रदान करणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत. जमीनिच्या सुपिकतेसाठी, पिकाच्या वाढीसाठी व रक्षणासाठी याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येतो.

संस्थेद्वारा पुरविलेल्या प्लास्टिक बाटल्यांमधे उपलब्ध ५० ग्रॅम कल्चर पासून २०० लिटर द्रावण तयार करता येते. हे एकच द्रावण पिकास पोषण व रोगप्रतिकारक म्हणून वापरता येते. द्रावण तयार करण्याची पद्धत अगदी सोपी व कमी खर्चिक आहे.

ज्या शेतकऱ्यांना मजुरांची समस्या, पैशांची कमतरता अथवा इतर सुविधे अभावी जनावरे पाळणे शक्य नाही व त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी जनावरांचे शेण व मूत्र उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त पर्याय आहे.

-साहित्य-वेस्ट डि कंपोजर (Waste Dcomposer)

– वेस्ट डि कंपोजर (Waste Dcomposer)
– २ किलो गुळ
– २०० लिटर क्षमतेचा प्लास्टिक ड्रम किंवा मातीचा रांजण (कोणत्याही धातूचा अजिबात नको)
– २०० लिटर पाणी (विहिरीचे, बोअरचे अथवा नळाचे यापैकी कुठलेही चालेल)

कसे बनवावे-
ड्रममधे २०० लिटर पाणी टाकावे. त्यात वेस्ट डि कंपोजर (Waste Dcomposer)  बाटलीतील कल्चर व २ किलो गुळ टाकून लाकडी काठीने २ ते ५ मिनिट ढवळावे. यानंतर हे द्रावण स्वच्छ कापड अथवा बारदानाने झाकावे.

स्थानिय वातावरण व तापमानानुसार हे द्रावण तयार होण्यास ५ ते ७ दिवसाचा अवधी जरूरी आहे. यादरम्यान दररोज दोनदा हे द्रावण लाकडी काठीने २ ते ५ मिनिट ढवळावे. द्रावण बनवताना ड्रम सावलीत किंवा उघड्यावर ठेवावे अशी कोणतीही अट नाही.
पहिल्या दिवशी द्रावणाचा रंग त्यातील गुळामुळे काहीसा तांबूस दिसेल.

तीन दिवसानंतर हा रंग काहीसा दुधाळ दिसू लागेल. ५ व्या किंवा ७ व्या दिवशी द्रावणाचा रंग पूर्णपणे दुधाळ दिसू लागेल. याचा अर्थ कल्चरमधील जीवाणू व एंझाइम्स द्रावणात पूर्णपणे विकसीत झाले आहेत व द्रावण वापरण्यासाठी तयार आहे.

-(Waste Dcomposer)कसे वापरावे-

जमीनीमधे
तयार झालेले २०० लिटर द्रावण १ एकरास ठिबकद्वारे अथवा पाटपाण्याने द्यावे. यामुळे जमीनीत सूक्ष्मजीवाणू व गांडूळांची वाढ होऊन जमिन सुपिक व भुसभुशित बनते. जमीनीतील सेंद्रीय पदार्थांचे अतीशीघ्र विघटन होऊन त्यांचे अन्नद्रव्यात रूपांतर होते. ही अन्नद्रव्ये पिकाच्या मुळांना सहजी ग्रहण करता येतात. परीणामी पिकांची वाढ जोमाने होते.

फवारणीसाठी
पिकांवर फवारणीसाठी १ लिटर पाण्यात ३०० मिली. या प्रमाणात वेस्ट डि कंपोजर Waste Dcomposer  द्रावण मिसळून दर ८ ते १५ दिवसांनी फवारल्यास हानीकरक बुरशी व कीड यांचा उपद्रव होत नाही. या प्रमाणानुसार फवारणीच्या १५ लिटर क्षमतेच्या पंपात ४ ते ४.५ लिटर द्रावण मिसळावे. आपल्या परीसरात होणाऱ्या प्रादुर्भावाच्या तीव्रतेनुसार फवारणीचा काळ आपण ठरवावा.

बीज प्रक्रियेसाठी
१ लिटर पाण्यात ३०० मिली. या प्रमाणात वेस्ट डि कंपोजर ( Waste Dcomposer) द्रावण मिसळून पेरणी आधी बियाण्यांवर शिंपडावे व अर्धा तास सावलीत वाळवून पेरणी अथवा टोकण करावी. रोप लावणी अगोदर त्याची मुळे या द्रावणात बुडवून लागण करावी. यामुळे बियाण्याचे व मुळांचे जमीनीतील हानीकरक विषाणू व बुरशी पासून बचाव होतो.

शेणखत कुजवण्यासाठी कंपोस्ट बनविण्यासाठी
अंदाजे १ टन शेणखताच्या ढिगावर केवळ २० लिटर वेस्ट डि कंपोजर ( Waste Dcomposer) द्रावण शिंपडावे. एक आठवड्यानंतर हा ढिग पलटावा व त्यावर पुन: २० लिटर द्रावण शिंपडावे असे दर आठवड्याला करत ४० दिवसात उत्तम प्रतीचे कुजलेले शेणखत तयार होते ज्यामधे उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची संख्या अधिक आहे.

शेणाऐवजी आपल्याकडील जमा केलेला काडीकचरा किंवा धान्य मळणीनंतर निघालेला कोणत्याही पिकाचा भुसा यावरही अशीच प्रक्रिया करून उत्तम प्रकारचे कंपोस्ट खत तयार करता येते.

महत्वाचे
एकदा तयार झालेया या द्रावणापासून आपण पुन: पुन: नवीन द्रावण तयार करू शकता. यासाठी तयार द्रावणातून पहील्यांदा २० लिटर द्रावण शिल्लक ठेवून त्यात २ किलो गुळ व १८० लिटर पाणी टाकून वरील प्रमाणेच कृती करावी. ५ ते ७ दिवसात तेवढ्याच उपयुक्ततेचे द्रावण तयार होईल.

किंवा तयार झालेल्या द्रावणातून नवीन २०० लिटर क्षमतेच्या ५ ड्रम मधे प्रत्येकी २० लिटर द्रावण, २ किलो गुळ व १८० लिटर पाणी टाकून पुढील ५ ते ७ दिवसात आपणास १००० लिटर द्रावण तयार होऊ शकते

वेस्ट डी कंपोज़र आपल्या पत्त्यावर घरपोच मागवण्यासाठी या पत्त्यावर संपर्क करावा.
ही संस्था केवळ २०/- रूपयात वेस्ट डी कंपोज़र Waste Dcomposer ची एक बॉटल आपल्या दिलेल्या पत्त्यावर पोस्ट पार्सलने पाठवते. ज्यामधे कुठलाही पार्सल खर्च किंवा GST कर अंतर्भूत नाही.
माहिती मिळवण्यासाठी किंवा मागवण्यासाठी या पत्त्यावर अथवा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करा

National Center of Organc Farming
Sector 19, Hapur Road,
Kamala Neharu Nagar,
Gaziabad – 201 002
Uttar Pradesh
Phone : 0120-2764212
2764906
Fax : 0120-2764901
Email : [email protected]
Website : http://ncof.dacnet.nic.in

वेस्ट डि कंपोजर Waste Dcomposer कसे प्राप्त करावे
महाराष्ट्रात मागविण्यासाठी खालील प्रकारे घरपोच मागविता येऊ शकतो
PAO DMI NAGPUR यांच्या नावाने स्टेट बैंक ऑफ इंडियाचा डिमांड ड्राफ्ट (DD) बनवावा.

किंवा
PAO DMI NAGPUR यांच्या नावाने इंडियन पोस्टल ऑर्डर (IPO) बनवावी.

किंवा
Regional Director, Regional Center of Organic Farming, Nagpur या नावाने मनी ऑर्डर (MO) पाठवावी.
वरील पैकी कोणत्याही एका प्रकारे रकम एका आवेदन पत्रासह पाठवावी. या मधे आपले नाव व पत्ता सुस्पष्ट अक्षरात मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत लिहावा. आपण किती बॉटल साठी किती रकम पाठविली तेही नमूद करावे.

एका बॉटलची किंमत सर्व खर्चासहित फक्त २०/- रूपये आहे.
आवेदन पत्रासह डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टल ऑर्डर किंवा मनी ऑर्डर पुढील पत्त्यावर पाठवावा.
REGIONAL DIRECTOR
REGIONAL CENTER OF ORGANIC FARMING
NH-4, AMARAVATI ROAD, GONDKHAIRI,
POST : WADI, TALUKA : KALMESHWAR
NAGPUR – 440023
PHONE NO. – 07118297054

Read More :- saaf fungicide Introduction to fungicides

Leave a Comment

West D Composer (वेस्ट डि कंपोजर) best no.1 bacterial culture saaf fungicide Introduction to fungicides PM किसान eKYC अपडेट
West D Composer (वेस्ट डि कंपोजर) best no.1 bacterial culture saaf fungicide Introduction to fungicides PM किसान eKYC अपडेट